ETV Bharat / state

धस - क्षीरसागर या 'मास लीडर' नेत्यांना डावलणे राष्ट्रवादीला पडले महागात; पत्करावा लागला पराभव - आमदार सुरेश धस

2014 पेक्षाही अधिक प्रमाणात सुप्त अशी मोदी लाट बीड लोकसभा मतदारसंघातही राहिली. आमदार धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना 70 हजार मतांची आघाडी आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना 6 हजार 262 मतांची आघाडी आहे.

प्रीतम मुंडे
author img

By

Published : May 24, 2019, 6:40 PM IST

बीड - जिल्ह्याच्या राजकारणात जयदत्त क्षीरसागर व आमदार सुरेश धस यांचा महत्तवाचा वाटा आहे. हे दोन्ही नेते 'मास लीडर' म्हणून ओळखले जातात. या मास लीडरांना राष्ट्रवादी काँग्रेसने डावलल्याने याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. जिल्ह्याचे भाजपचे नेतृत्व मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोन्ही नेत्यांना स्वीकारून लोकसभा निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे.

लोकसभेच्या निकालावर आमचे प्रतिनिधी व्यंकटेश वैष्णव यांनी केलेल विष्लेशण

बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची लोकसभेच्या प्रचाराची संपूर्ण धुरा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर होती. बीडमध्ये देखील सर्व अधिकार धनंजय मुंडे यांच्याकडे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील श्रेष्ठींनी धनंजय मुंडे यांच्यावर निर्भय राहत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये पूर्वी असलेले मास लीडर जयदत्त क्षीरसागर व आमदार सुरेश धस यांना डावलून त्यांचे खच्चीकरण केले. याचाच परिणाम दोन दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीने दिग्गज नेत्यांना डावलणे हे त्यांच्याच पत्त्यावर पडले.

याशिवाय 2014 पेक्षाही अधिक प्रमाणात सुप्त अशी मोदी लाट बीड लोकसभा मतदारसंघातही राहिली. आमदार धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना 70 हजार मतांची आघाडी आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना 6 हजार 262 मतांची आघाडी आहे. आता केवळ चार महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजपने बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवले आहे. हे वातावरण चार महिने टिकवून ठेवण्यासाठी बीड भाजपचे नेतृत्व पंकजा मुंडे काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे. आज घडीला मात्र बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजपला प्लस आहेत.

बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचे समर्थक सक्षम ठरले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कडवा विरोध करत डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली. याचाच परिणाम बीड विधानसभा मतदारसंघातून सहा हजाराहून अधिक मताधिक्य डॉ. प्रीतम मुंडे यांना मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा लाभ चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये करून घेण्यावर भाजप नेतृत्वाने भर देणे आवश्यक आहे. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी राज्यात भाजपबरोबर आहे. मात्र, बीडमध्ये भाजपच्याविरोधात काम करणार अशी भूमिका मेटे यांनी घेतल्यानंतर अधिक सावधपणे पंकजा मुंडे यांनी एका मुरब्बी राजकारण्याप्रमाणे खेळी केली. अगोदर जयदत्त क्षीरसागर यांना जवळ करून थेट प्रचारात उतरवले. याशिवाय आमदार विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांना देखील भाजपने फोडले. या सर्व प्रकारामुळे आमदार मेटे यांच्या बंडाचा पंकजा मुंडे व बीडच्या भाजपवर काडीचाही फरक पडला नाही.

Intro: संपादक साहेब यांनी दिलेल्या सूचनेवरून बीड लोकसभेच्या निकालांचे विश्लेषण पाठवत आहे. बरोबर p2c देखील अपलोड करत आहे. **************** बीड: धस- क्षीरसागर या 'मास लीडर' असलेल्यांना डावलने राष्ट्रवादी काँग्रेसला पडले महागात बीड- बीड जिल्ह्याच्या राजकारणात ठेवणाऱ्या नेत्यांमध्ये जयदत्त क्षीरसागर व आ. सुरेश धस यांचा समावेश आहे. हे दोन्ही नेते 'मास लीडर, म्हणून ओळखले जातात. या 'मास लीडर' यांना राष्ट्रवादी काँग्रेसने डावलले तर बीडचे भाजपचे नेतृत्व मंत्री पंकजा मुंडे यांनी या दोन्ही 'मास लीडर' ला स्वीकारून लोकसभा निवडणुकीच्या निकाल राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला आहे.

Body:लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या प्रचाराची संपूर्ण धुरा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर होती. बीडमध्ये देखील सर्व अधिकार धनंजय मुंडे यांच्याकडे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील श्रेष्ठींनी धनंजय मुंडे यांच्यावर निर्भय रहात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पूर्वी असलेले 'मास लीडर' जयदत्त क्षीरसागर व आ. सुरेश धस यांना डावलून त्यांचे खच्चीकरण केले. याचाच परिणाम दोन दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिग्गज नेत्यांना डावळणे भाजपच्या पत्त्यावर पडले. याशिवाय 2014 पेक्षाही अधिक प्रमाणात सुप्त अशी मोदी लाट बीड लोकसभा मतदारसंघातही राहिली. आ. धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना 70 हजार मतांची आघाडी आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना 6 हजार 262 मतांची आघाडी आहे. आता केवळ चार महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजपने बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्य मोठे मताधिक्य मिळवले आहे. हे वातावरण चार महिने टिकवून ठेवण्यासाठी बीड भाजपचे नेतृत्व पंकजा मुंडे काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे. आज घडीला मात्र बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजपला प्लस आहेत.

Conclusion:बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचे समर्थक सक्षम ठरले आहेत. बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कडवा विरोध करत डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली. याचाच परिणाम बीड विधानसभा मतदारसंघातून सहा हजाराहून अधिक मताधिक्य डॉ. प्रीतम मुंडे यांना मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा लाभ चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये करून घेण्यावर भाजप नेतृत्वाने भर देणे आवश्यक आहे. शिवसंग्राम आ. विनायक मेटे यांनी राज्यात भाजप बरोबर आहे मात्र बीडमध्ये भाजपच्या विरोधात काम करणार अशी भूमिका मेटे यांनी घेतल्यानंतर अधिक सावधपणे पंकजा मुंडे यांनी एका मुरब्बी राजकारण्याप्रमाणे खेळी केली अगोदर तत्कालीन बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जयदत्त क्षीरसागर यांना जवळ करून थेट प्रचारात उतरवले. याशिवाय आमदार विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांना देखील भाजपने फोडले. या सर्व प्रकारामुळे आमदार मेटे यांच्या बंडाचा पंकजा मुंडे व बीडच्या भाजपवर काडीचाही फरक पडला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.