ETV Bharat / state

धक्कादायक..! रुग्णालयात लागलेल्या आगीत डॉक्टराचा मृत्यू - बीड बातमी

बीड जिल्ह्यातील बागपिंपळगाव फाट्यावर (ता. गेवराई) असलेल्या एका रुग्णालयात सोमवारी (दि. 8 जून) पहाटे आग लागली. या घटनेत डॉक्टराचा मृत्यू झाला असून कंपाउंडर जखमी झाला आहे. जखमीवर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

died doctor
मृत डॉक्टर
author img

By

Published : Jun 8, 2020, 1:34 PM IST

बीड- गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव फाट्यावर असलेल्या एका रुग्णालयात सोमवारी (दि. 8 जून) पहाटे आग लागली होती. दरम्यान रुग्णालयातील फ्रिजचा स्फोट झाला. फ्रिजच्या स्फोटामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. यात डॉक्टराचा होरपळून मृत्यू झाला आहे.

डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले (वय 42 वर्षे, रा. जायकवाडी कॅम्प) असे मृत डॉक्टराचे नाव असून रुग्णालयातील मदतनीस (कंपाउंडर) सुनील माळी जखमी झाले आहेत. माळींरव बीड येथील जिल्हारुग्णलयात उपचार सुरू आहेत.

e
er

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मृत डॉक्टर आणि मेडीकल चालक यांच्यात वाद असल्याची चर्चा देखील होत आहे. यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा - जेसीबी खाली चिरडून पित्याचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.