ETV Bharat / state

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे आदेश - Bharatbhushan Kshirsagar beed news

चुकीचे कागदोपत्री दाखवून दिशाभूल करण्यात आली आहे, त्यामुळे माझी आणि बीडच्या जनतेची बदनामी झाली आहे. म्हणून तक्रारदारावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे मत नगराध्यक्ष भरातभूषण क्षीरसागर यांनी दिले.

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर
नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर
author img

By

Published : Feb 9, 2021, 8:36 AM IST

बीड - बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना उपअभियंता प्रकरण चांगलेच भावले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी केलेल्या तक्रारीवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी क्षीरसागर यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कडक नियमावली जाहीर

शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कारवाई होत असल्यामुळे बीडचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील तक्रारदार अमर नाईकवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केले. दुसरीकडे, या कारवाईनंतर नगराध्यक्ष क्षीरसागर यांनी सदर कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला आहे. तसेच आपण याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही विकास कामे करत आहोत. बीड शहरातील विकास काम विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे असा खोडसाळपणा करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.

तक्रारदारावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा करणार -

चुकीचे कागदोपत्री दाखवून दिशाभूल करण्यात आली आहे, त्यामुळे माझी आणि बीडच्या जनतेची बदनामी झाली आहे. म्हणून तक्रारदारावर लवकरच अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे मत नगराध्यक्ष भरातभूषण क्षीरसागर यांनी दिले.

काय आहे प्रकरण -

बीड नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांवर गुणवत्ता आणि दर्जेदार कामे व्हावीत, म्हणून एखाद्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्याची मागणी करणे हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून कर्तव्य होते. परंतु विरोधकांनी याबाबत कामात खोडा घालण्याच्या उद्देशाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. अभियंत्यांना नियुक्त करण्याची मागणी करणे गैर नाही. मात्र या प्रकरणात केवळ आपली बदनामी करण्यासाठी राजकीय हेतूने आणि जनतेत आपल्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे हेतूने कारवाई सुरू करण्यात आली. मात्र याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही केली नाही. किंवा तसे न्यायालयाचे निर्देशही नाहीत. असे असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीडमधून जाता जाता अपात्रतेचे निर्देश देण्याच्या कागदावर कोणत्या उद्देशाने सही केली हे मात्र गुलदस्त्यात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.