ETV Bharat / state

Beed Crime News: कन्हेरवाडीत सिगारेटच्या पैशाच्या वादातून अज्ञातांनी केला गोळीबार; हॉटेलमधील सामानाची केली तोडफोड - Beed News

सिगारेट पाकीटचे पैसे मागितल्याचा राग आल्यावरुन 4 अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ घडली आहे. या घटनेप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
पैशाच्या वादातून अज्ञातांनी केला गोळीबार
author img

By

Published : Aug 10, 2023, 8:53 PM IST

बीड : गुरूवारी बीड स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. कन्हेरवाडी परिसरातील हॉटेल यशराजमध्ये हॉटेलच्या मॅनेजरने सिगारेट पाकीटचे पैसे मागितल्याचा राग आल्यावरुन 4 अज्ञातांनी रात्री 10:45 वाजेच्या सुमारास गोळीबार केला. यावेळी हॉटेलात चांगलाच राडा झाला होता.

काय आहे नेमका प्रकार : हॉटेल यशराजमध्ये गुरूवारी रात्री 4 अज्ञात ग्राहक आले होते. यांनी याठिकाणी काही वेळ घालवल्यानंतर जातांना हॉटेलच्या मनेजरसोबत सिगारेट पाकीटच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हॉटेलातील साहित्यांची तोडफोड देखील केली. मॅनेजरने विरोध केला असता. चौघांपैकी एकाने हवेत बंदुकीच्या 3 गोळ्या झाडात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने चौघे अज्ञातांनी तिथून पळ काढला. या घटनेप्रकरणी आज हॉटेल मालकाने फिर्याद दिल्याने, परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलमधील सामानाची केली तोडफोड : हॉटेलवरुन जात असताना आरोपींनी मॅनेजर नरेश निसाद यास सिगारेट पाकीट मागितले. मॅनेजर नरेश निसाद याने सिगारेटचे पाकीट देत 150 रुपये मागितले. मॅनेजरने पैसे मागितल्याचा राग आल्याने संशयितांनी मॅनेजर नरेश निसादची कॉलरला पकडून त्याला मारहाण करत शिवीगाळ केली. याचवेळी हॉटेलमधील सामानाची तोडफोड करत हवेत गोळीबार केला. हवेत एक गोळी फायर होताच गोळीबाराचा आवाज खळबळ उडली. यावेळी घाबरलेल्या नोकरांनी तात्काळ हॉटेलचे शटर लावून घेतले. त्यामुळे संतापलेल्या चौघांनीनंतर शटरवर दोन राउंड फायर केले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही पिस्तूल नेमकी या व्यक्तीजवळ आली कशी याचा परवाना त्याच्याजवळ आहे का? पिस्तूल जवळ बाळगण्या कारण नेमक काय आहे. याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे.

हेही वाचा -

  1. Chhatrapati Sambhajinagar Crime News : उधारीचे पैसे मागितल्याने भररस्त्यात गोळीबार करून केले ठार, तरुणाचे दहा दिवसांनी होणार होते लग्न
  2. Sambhajinagar firing : औरंगाबादमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू दुसरा गंभीर
  3. Jaipur Mumbai Train Firing : जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधील घटना कशी घडली? जीआरपीने गुन्ह्याचा प्रसंग पुन्हा केला उभा

सिगारेटच्या पैशाच्या वादातून गोळीबार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.