ETV Bharat / state

धानोरा ग्रामीण रुग्णालय स्वच्छतेमध्ये राज्यात दुसरे; जिल्हा शल्यचिकित्सकांची माहिती - महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण रुग्णालयाला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला असून दहा लाख रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीसदेखील जाहीर झाले आहे.

Breaking News
author img

By

Published : May 8, 2019, 10:55 AM IST

बीड - महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत स्वच्छतेचे राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यामध्ये बीड जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण रुग्णालयाला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला असून दहा लाख रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देखील जाहीर झाले. या बाबतची माहिती बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला गतवर्षी येथील ग्रामस्थांनी आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्यावरून कुलूप ठोकले होते.

डॉ. थोरात यांनी परिश्रम घेत केवळ दीड वर्षांमध्ये कायाकल्प योजनेंतर्गत धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला स्वच्छतेमध्ये राज्यात दुसऱ्या दुसरा क्रमांक मिळवून दिला. यामुळे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात सक्षम आरोग्य सेवा मिळावी याशिवाय स्वच्छता असावी यादृष्टीने शासन कायाकल्प योजनेंतर्गत विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील धानोरासह उपजिल्हा रुग्णालय केज, स्त्री रुग्णालय, नेकनूर ग्रामीण रुग्णालय धारूर, पाटोदा व नांदुरघाट या ग्रामीण भागातील रुग्णालयांना प्रत्येकी एक लक्ष रुपयाचे शासनाचे पुरस्कार मिळाले. शासनाच्या या योजनेमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येतो. विशेष म्हणजे धानोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी तसेच परिचारिका यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे त्यांचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे.

गतवर्षी हा पुरस्कार केज येथील उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला होता. या यशामध्ये डॉ. सतीश हरिदास, डॉ. संजीवनी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजीत जाधव डॉ. बाळासाहेब सोळंके, डॉ. सुधीर राऊत, महानंदा मुंडे या वैद्यकीय अधीक्षकांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी सांगितले.

Intro:खालील बातमी जे फोटो मेल केले आहेत......
†**************

राज्यात स्वच्छतेमध्ये बीड चा दुसरा क्रमांक; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची माहिती

बीड- महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कायाकल्प अंतर्गत आरोग्य संस्थांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेचे राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यामध्ये बीड जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण रुग्णालयाला महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळाला असून दहा लक्ष रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देखील जाहीर झाले असल्याची माहिती बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली. विशेष म्हणजे धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला गतवर्षी येथील ग्रामस्थांनी आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्या वरून कुलूप ठोकले होते. डॉ. थोरात यांनी परिश्रम घेत केवळ दीड वर्षांमध्ये कायाकल्प अंतर्गत धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला स्वच्छतेमध्ये राज्यात दुसऱ्या दुसरा क्रमांक मिळवून दिला. यामुळे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Body:आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात सक्षम आरोग्य सेवा मिळावी याशिवाय स्वच्छता असावी यादृष्टीने शासन कायाकल्प योजने अंतर्गत विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील धानोरा सह उपजिल्हा रुग्णालय केज, स्त्री रुग्णालय, नेकनूर ग्रामीण रुग्णालय धारूर, पाटोदा व नांदुरघाट या ग्रामीण भागातील रुग्णालयांना प्रत्येकी एक लक्ष रुपयाचे शासनाचे पुरस्कार मिळाले. शासनाच्या या योजनेमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मध्ये देखील उत्साह दिसून येतो. विशेष म्हणजे धानोरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी तसेच परिचारिका यांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे त्यांचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे.

Conclusion:गत वर्षी हा पुरस्कार केज येथील उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला होता. या यशामध्ये डॉक्टर सतीश हरिदास , डॉ. संजीवनी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजीत जाधव डॉ. बाळासाहेब सोळंके, डॉ. सुधीर राऊत , महानंदा मुंडे या वैद्यकीय अधीक्षकांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.