ETV Bharat / state

प्रीतम मुंडे रेल्वेत बसूनच उमेदवारी अर्ज भरायला येणार का? धनंजय मुंडेंचा टोला - धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात लाखांच्या सभा आम्ही यापूर्वी केलेल्या आहेत. सभा आणि रॅली काढण्यामध्ये आमचा नाद कोणी करायचा नाही? असेही धनंजय यावेळी म्हणाले.

धनंजय मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे
author img

By

Published : Mar 25, 2019, 2:00 PM IST

Updated : Mar 25, 2019, 2:46 PM IST

बीड - प्रीतम मुंडे बीड लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता रेल्वेमध्ये बसूनच येणार आहेत का? असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. २०१९ पर्यंत रेल्वे आणण्याचा शब्द मंत्री पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांनी बीडकरांना दिला होता. मात्र, २०१९ पर्यंत बीडला रेल्वे येऊ शकली नाही. यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दोन्ही बहिणीला टोला लगावला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे

संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा उमेदवारी अर्ज २५ मार्चला भव्य रॅलीसह दाखल करण्याबाबत निवेदन देऊन प्रशासनाकडून परवानगी मिळवली होती. मात्र, भाजपच्या उमेदवाराला त्याच रस्त्यावरून रॅलीला परवानगी दिली. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला परवानगी नाकारण्यात आली. एका पक्षाला रॅलीसाठी परवानगी दिली असताना, दुसऱ्या पक्षाला परवानगी न देणे हे कायद्याच्या विरोधात आहे. मात्र, तरीही दबावाखाली येऊन परवानगी देण्यात आली. निवडणुकींच्या काळात वारंवार अशी दडपशाही होऊ नये यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांसह, जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत असंेधनंजय मुंडे म्हणाले. तसेच बीड जिल्ह्यात लाखांच्या सभा आम्ही यापूर्वी केलेल्या आहेत. सभा आणि रॅली काढण्यामध्ये आमचा नाद कोणी करायचा नाही? असेही धनंजय यावेळी म्हणाले.

Intro:प्रीतम मुंडे या आता रेल्वेत बसूनच उमेदवारी अर्ज भरायला येणार का? धनंजय मुंडे चा बहिणाबाईला टोला

बीड- प्रीतम मुंडे या काय आता बीड लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रेल्वे मध्ये बसून येणार आहेत का? असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बहिणाबाई लगावला. 2019 पर्यंत रेल्वे आणू असा शब्द मंत्री पंकजा मुंडे व डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी बीडकरांना दिला होता. मात्र 2019 पर्यंत बीडला रेल्वे येऊ शकली नाही. यावरून धनंजय मुंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.

Body:बीड येथे सोमवारी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत भाजप वर जोरदार टीका केली. एवढ्यावरच न थांबता धनंजय मुंडे यांनी परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाची झालेली हत्या याबाबत नाराजी व्यक्त करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परळी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची हत्या केली असल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून लवकरच सत्य बाहेर येईल येईल असेही ते ते म्हणाले. भाजप सत्तेचा व बळाचा वापर करून जिल्हा प्रशासनाला आचारसंहितेच्या काळात वेठीस धरत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

Conclusion:बीड जिल्ह्यात लाखांच्या सभा आम्ही यापूर्वी केलेल्या आहेत. सभा व रॅली काढण्यामध्ये आमचा नाद कोणी करायचा नाही असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Mar 25, 2019, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.