बीड - ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांनी आखलेल्या रणनीतीमध्ये पहिलाच षटकार मारला आहे. परळी तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी पांगरी ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बिनविरोध झाली आहे.
11 जागा पैकी 10 जागांवर राष्ट्रवादीची सत्ता - सरपंचपदी सुशील वाल्मीकराव कराड यांच्यासह 11 पैकी 10 सदस्य आज निवडणूक फॉर्म काढून घेण्याच्या अखेरच्या क्षणी बिनविरोध ठरले आहेत. यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा परळी मतदारसंघात आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये सचिन तिडके, अशाबाई पाचंगे, उषाबाई मुंडे, नितलताई गित्ते, ग्यानदेव मुंडे, मीनाताई कराड, कोमलताई घोडके, अनुसयाबाई राठोड, सुरेश चव्हाण, वाल्मिक पाचंगे हे दहा सदस्य बिनविरोध घोषित झाले असून, केवळ एका जागेसाठी निवडनुक होणार आहे. प्रभाग क्र.2 मधील ही जागा सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असुन, इथे राष्ट्रवादीचे सुदर्शन तिडके निवडणूक लढवणार आहेत.
सर्व सदस्यांचे अभिनंदन - दरम्यान सर्व नवनियुक्त सदस्यांचे धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, माऊली मुंडे, शंकर तिडके, वसंतराव तिडके, दत्तू तिडके, दत्ताभाऊ कराड, ऍड. श्रीनिवास मुंडे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर मुंडे यांसह पांगरी गोपीनाथ गड येथील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विश्वास सार्थ ठरवणार - सुशील कराड दरम्यान मागच्या 5 वर्षानंतर आमच्यावर विश्वास ठेवून आमचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा गावकऱ्यांची सेवा करायची संधी दिली आहे. समस्त ग्रामस्थांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध आमच्या ताब्यात दिली आहे. आगामी काळात ग्रामस्थांचा हा विश्वास सार्थ ठरेल, असे विकास पर्व राबवून दाखवू, असा विश्वास नवनियुक्त सरपंच सुशील कराड यांनी व्यक्त करत आहे.