ETV Bharat / state

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना फोन, तब्येतीची केली विचारपूस

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.

dhananjay munde advised sister pankaja munde to take care of health
धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना फोन, तब्येतीची केली विचारपूस
author img

By

Published : Dec 2, 2020, 1:15 PM IST

बीड - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भगिनी व माजी मंत्री पंकजाताई मुंडे या आजारी असल्याचे समजताच त्यांना फोन करून तब्येतीची विचारपूस केली आहे. पंकजा मुंडे यांना ताप खोकला असून त्यांनी स्वतः ट्विट करून आयसोलेट झाल्याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्यात धनंजय मुंडे हे कोरोना विषाणूचा सामना करून, त्यावर मात करून परत आले. या आजारात होणारा त्रास मी अनुभवला असून त्यादृष्टीने काळजी घ्यावी, असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी पंकजाताईंना दिला.

dhananjay munde advised sister pankaja munde to take care of health
धनंजय मुंडेंचे ट्विट

हेही वाचा - विराटचा वनडेत भीमपराक्रम, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे

पंकजा मुंडे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यात आल्या होत्या. प्रचारादरम्यान त्यांना सर्दी, खोकला व ताप आल्याने त्या मुंबईला परतल्या. त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. पंकजा मुंडे यांनी कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.