ETV Bharat / state

Beed News: 'या' साखर कारखान्यात सुरक्षा किट नसल्याने बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू - death of worker in sugar factory Beed

माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्यावर बॉयलरच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री घडली आहे. घटनेची माहिती होताच कारखान्यातील कर्मचारी आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Beed News
साखर कारखान्यावर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
author img

By

Published : Feb 23, 2023, 1:13 PM IST

साखर कारखान्यावर कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

बीड : माजलगाव येथील जय महेश साखर कारखाना या ठिकाणी कल्याण गणपती टोले (वय वर्ष 40) हे आनंदगाव येथील रहिवासी कामगार होते. टोले हे तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखाना म्हणजेच शुगर इंडस्ट्रीमध्ये कामगार म्हणून कामाला होते. कारखान्याचे काही मशिनरींची दुरुस्ती सध्या गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. नादुरुस्त मशिनरी दुरुस्त करण्यामुळे रात्रीच्या वेळेला हे काम चालू होते. मात्र रात्रीच्या दरम्यान कल्याण टोले हे बॉयलरजवळ काम करत होते, यावेळेस अचानक मशीनचा पट्टा चालू झाल्याने कल्याण ह्या मशीनच्या पट्ट्याकडे ओढले गेले. यामध्येच या पट्ट्यात अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे.

तरुणांचा अपघाती मृत्यू : ही घटना आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना कळताच मशीन बंद करण्यात आली. त्यानंतर त्यांना येथील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ फोन करून या घटनेची माहिती सांगितली. मात्र या घटनेने कारखाना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कल्याण टोले यांच्या पश्चात दोन मुली, पत्नी आई, वडील असा परिवार आहे. ज्या गावचे कल्याण टोले आहेत, त्या गावांमध्ये याआधी देखील एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच अपघाताने पुन्हा एक मृत्यू झाला आहे. यामुळे आनंदगावामध्ये तरुणांचा अपघाती मृत्यू ही मोठे धक्कादायक गोष्ट मानली जात आहे. यामुळे गावात या घटनांमुळे हळहळ वेक्त केली जात आहे.

कारखाने काय करतात? या घटनेचा तपास पोलीस प्रशासन करत असल्याचे त्या ठिकाणी तपास अधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मात्र बीड जिल्ह्यात अनेक कारखाने आहेत. यामध्ये कारखाने चालवणाऱ्यांनी या मजुरांची योग्य ती काळजी घेणे, यासाठी कारखाने काय करतात? असे देखील अनेक प्रश्न उभा राहत आहेत. एखादा अपघात झाला तर त्याला कारखान्यावर एखादी ॲम्बुलन्स, प्राथमिक उपचार अशा गोष्टी असणे गरजेचे आहे, मात्र अनेक कारखान्यावर या गोष्टी पाहायला मिळत नाही. या घटनेने कारखाना परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मृत्युमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : Thane Crime: जळगाव न्यायालय परिसरात गोळीबाराचा प्रयत्न करून झाला होता फरार; आरोपीला मंगला एक्सप्रेसमधून पिस्तूलसह अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.