बीड - येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका 45 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4 वाजता घडली आहे. या तरुणाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल येण्यापूर्वीच या तरुणाचा आयसोलेशन वार्डात मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
बीड येथील जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वार्डात रिपोर्ट येण्यापूर्वीच एका 45 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्णाला लिव्हरचा त्रास होता. जिल्हा रुग्णालयात मागील दोन-तीन दिवसांंपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने संबंधित तरुणाला आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट करून त्याचा स्वाब नमुना घेतला होता. मात्र, त्यानंतर काही तासातच त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हा तरुण बीड शहरातील राहणारा असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. बीड जिल्ह्यात एकूण 25 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यात आतापर्यंत 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर या घडीला 25 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.