बीड - जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेत मराठा ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी परळी येथे गुरुवारपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाहीत. आतापर्यंत मराठा समाज शांततेत होता मात्र आता आरक्षणासाठी आम्ही आमचा लढा तीव्र करणार असल्याचे मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी सांगितले.
गुरुवारी परळी शहरात मराठा क्रांती ठोक मोर्चा पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. यादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यभरातून मराठा ठोक मोर्चाचे पदाधिकारी परळी येथे येणार असल्याचेही समन्वयकांनी सांगितले.