बीड :
बीड जिल्हा म्हटलं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा बीड जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच बीड जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांमध्ये तब्बल 220 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत गेवराईच्या रामनाथ दाभाडे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सीताफळ लागवड करून आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. रामनाथ दाभाडे हे वर्षाकाठी पन्नास लाख रुपये उत्पादन आपल्या शेतीतून मिळवत (50 Lakh Rupees Outturn Custard apple Cultivation ) आहेत. बाकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते आव्हान करत आहेत की आपणही आपल्या शेतामध्ये पारंपारिक शेतीला फाटा देत फळबाग लागवड करा पाहूयात याविषयीचा एक स्पेशल रिपोर्ट.
50 लाखांपर्यंत उत्पन्न : मी 1992 पासून कापूस लागवड करत होतो. 2017 पर्यंत कापूस लागवड केली. त्या कापसाच्या शेतीमध्ये वर्षाला अडीचशे ते तीनशे क्विंटलपर्यंत कापूस होत होता. त्याच्यामध्ये त्याच्यात खर्चच अर्धा निघून जात होता. जवळपास 70 टक्के खर्च होत होता. मजुराची अडचण, गड्यांची अडचण, कधी अतिवृष्टी कधी कधी कमी पाऊस, त्याला कीड प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला, त्यामुळे आम्ही कापूस लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही सिताफळ लागवड करायचा निर्णय घेतला. त्यावेळेस मला साधारण वर्षाला नव्हते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न येत होतं, आज रोजी मला 50 लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळत आहे. आज माझं जवळपास दहापट उत्पन्न वाढलं आहे. अपेक्षा अपेक्षा चार पटीने पैसे मिळाले आहेत. मी लावताना असा विचार केला होता की आपल्याला वर्षाला पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळेल. पण माझ्या अपेक्षा पेक्षाही जास्त उत्पन्न मला मिळाला आहे. यावर्षी मला 50 लाख रुपयांचा उत्पन्न झाले. आणि पुढच्या वर्षी या बागेला दीडपट माल लागणार (Custard Apple Cultivation In Beed District )आहे. याचे उत्पादन अजूनही वाढणार आहे. हे झाड साधारण 40 वर्षे टिकत. या झाडाला मरण नाही आपण पाहतो की जी गावरान जुनी झाड आहे ते आपण लहानपणापासून पाहतो ती तशीच आहेत. ही फळबाग चांगली आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीतील अर्ध्या तरी जमिनीत फळबाग लागवड करावी. सिताफळ लावा, अंगूर लावा किंवा कोणतीही फळबाग लावा, पाणी जितका आहे तितकी फळबाग आपल्याकडे असायलाच पाहिजे.
अपेक्षे पेक्षा जास्त उत्पन्न : शेतामध्ये एक सीताफळाचे झाड छोटे होते. झाडाला आम्ही मोठे झाल्यावर त्याला खत पाणी घातले. त्याला पहिल्या वर्षी चांगली फळे लागली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीही त्याला अधिक फळ लागत गेली. नंतर आम्ही विचार केला की जर आपण सीताफळाची लागवड केली तर, आम्ही पाहुण्याकडे लग्नानिमित्त गेलो असता त्यांच्याकडे सीताफळाची बाग होती. मग आम्ही घरी विचार केला की आपण सुद्धा सीताफळाची बाग लावू. आम्ही त्यांच्या बागेमध्ये जाऊन पाहणी केली. आम्ही त्यांना सविस्तर माहिती विचारली असता ही रोपे त्यांच्याकडेच मिळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही रोपे घेतली व लागवड केली. यावर्षी पाऊस काळ कमी होता व विहिरीत जे पाणी होते तसे तसे रात्री दिवसा या झाडाला पाणी घालत त्यांना लहानाची मोठी केली. पहिल्या वर्षी बऱ्यापैकी झाडांना फळे लागली. उत्पन्नही निघाले व आता यावर्षी सुद्धा उत्पन्न चांगले निघाले आहे. त्या पिकापेक्षा हे पीक घेतल्यामुळे आम्हाला चांगले वाटू लागले आहे. खडतर काळात आम्ही हे झाड लावलं त्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे. मोठ्या मुलांना व माझ्या मिस्टरांनी या झाडांची जास्त काळजी घेतली. फळबाग करावीच ही आमची तिघांची इच्छा होती. कुणीतरी महिलांनी अशी हिम्मत करायला पाहिजे. आपण केल्याचे फळ मिळत आहे असं वाटायला लागला आहे. कापूस किंवा इतर पिके घेतल्यास त्याला मजूर मिळत नाही मात्र याला मजूर कमी लागत आहे.