ETV Bharat / state

CRPF Jawan Dies : डेंग्यूने घेतला CRPF च्या जवानाचा बळी; मेजर काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - CRPF Jawan Dies

धामणगाव येथील CRPF मधील 38 वर्षीय मेजर असणाऱ्या जवानाचा डेंग्यूने मृत्यू (CRPF jawan dies due to dengue) झाला आहे. अजिनाथ काळे (Soldier Ajitnath Kale Death) असे मृत जवानाचे नाव आहे. (Latest news from Beed) अजिनाथवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले (CRPF Jawan Funeral in Beed) आहेत.

CRPF Jawan Dies
डेंग्यूने घेतला CRPF च्या जवानाचा बळी
author img

By

Published : Jan 7, 2023, 4:35 PM IST

मेजर काळेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बीड : सैनिक अजिनाथ काळे (Soldier Ajitnath Kale Death) हे छत्तीसगड येथे कर्तव्यावर होते. यादरम्यान आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना डेंग्यूची लागण (CRPF jawan dies due to dengue) झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालावली. (Latest news from Beed)

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : दरम्यान बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

डेंग्यूची लक्षणे ( Symptoms of dengue ) : शरीरातील स्नायू व सांधे दुखणे, डोकेदुखी, अस्वस्थता, रक्तदाब कमी होणे, उलट्या होणे, मळमळ, सुस्ती, त्वचेचा सौम्य लालसरपणा (पुरळ) आणि ताप ही प्रादुर्भावाची प्रमुख लक्षणे आहेत.अशा प्रकारे डेंग्यूचा प्रसार होण्यापासून रोखा ( Prevent the spread of dengue ): पावसाळ्यात घरांमध्ये पाणी साचू देऊ नका. कूलरमधून वेळोवेळी पाणी काढून टाकत राहा. भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. टायरमध्ये पाणी साचू देऊ नका. स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. झोपताना मच्छरदाणी वापरा.

अशी घ्या काळजी : शहरातील परिस्थिती पाहिली तर डासांमुळे आजार हे खूप पसरत आहेत. यासाठी आपल्याला विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रत्येकाने घरात तसेच सोसायटीच्या परिसरात स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने पाऊस आला तर त्या पावसात भिजू नये, तसेच फ्रिजमधील पदार्थ खाण्यास टाळावे, मसालेदार पदार्थ खाऊ नये आणि विशेष म्हणजे सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास बाहेरील औषधे न घेता डॉक्टरांच्याच सल्ल्याने औषधे घेतली पाहिजे, अशी खबरदारी सर्वसामान्य नागरिकांनी घेतली पाहिजे, असे देखील भोंडवे यावेळी म्हणाले.

शहरात डेंग्यूची साथ : शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. तसेच मध्येच हवेत गारवा जाणवतो. अशा संमिश्र वातावरणामुळे बाह्यरुग्ण विभागात सर्दी, ताप, खोकला याची लक्षणे असलेले रुग्ण येत आहेत. शहरात ऑक्टोबरच्या मध्यापासून ते आतापर्यंत थंडी ही पहिल्यासारखी पडलेली नाही. शहरात काही दिवसांपासून रात्री कधी थंडी, तर कधी गरम तर दिवसा कधी पाऊस असच सत्र हे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम म्हणून काही आजार हे निश्चितच वाढले आहेत. स्वच्छ पाण्यात आढळणाऱ्या डासांपासून डेंगू आणि चिकणगुणियाच्या आजारात वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात डेंग्यूची साथ आली आहे. एवढ्याप्रमाणात शहरात डेंग्यूचे रुग्ण हे सापडत आहेत. हा डेंग्यू हिमेरिजेक डेंग्यू नसल्याने यात कोणीचाही मृत्यू होत नाही. हा डेंग्यू साधारण 8 ते 10 दिवसात बरा होतो. परंतु, चिकणगुनिया जो पूणे शहरात मागच्या एक ते 2 वर्षात काहीच नव्हता त्याचे रुग्ण मात्र शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू शकते ( Number of dengue patients may increase ) : डॉ. बिश्त यांच्या मते, डेंग्यू चाचणी योग्य न होण्याचे कारण डेंग्यूचा पुन्हा संसर्ग किंवा प्रकार 2 आणि 4 चे संसर्ग असू शकते. हे सर्वांना माहीत आहे की 2019 मध्ये डेंग्यूच्या संसर्गाने जगात सर्वाधिक रुग्ण आढळले होते, आता तीन वर्षांनंतर पुन्हा संसर्गाची संख्या जास्त असू शकते. अशा परिस्थितीत डेंग्यूचा दुसरा किंवा तिसरा रिपोर्ट आल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो, असा सल्ला सर्व डॉक्टर रुग्णांना देत आहेत. उदाहरणार्थ, S-1 चाचणी सुरुवातीला केली नाही किंवा ताप गेल्यावर पुन्हा ताप आला तर फक्त निगेटिव्ह येईल. कारण प्रतिजन चाचणी 7 दिवसांनी निगेटिव्ह येते. अँटीबॉडी चाचणी 7 दिवसांपूर्वी नकारात्मक राहते. तापाचा नेमका कालावधी न कळणे हे यामागचे एक कारण आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.