बीड : विशेष करून रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटे आळीचा प्रादुर्भाव (Crop worm infestation) सुरू झाला आहे. कांदा पिकांचे पाते पिवळे पडू लागले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र धुई पसरली असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी संकटात (Crisis on farmers in Beed district) सापडला आहे. हरभरा पिकांवर या घाटेआळीने आक्रमण केल्याने पिकाला आलेला हरभरा फोल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होणार असून पुन्हा एकदा अस्मानी संकटाच्या खाईत शेतकरी अडकला आहे (effect of this mist on crops). त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शासन मदत करील का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Latest news from Beed)
शेतकऱ्यांच्या आत्महत्या : जिल्ह्यात परतीच्या पावसानं हाहाकार माजवला होता आणि याच हाहाकारामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, बाजरी, तुर, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीसह विविध कारणांनी बीड जिल्ह्यात 268 शेतकऱ्यांच्या आत्महत्या करून आपले जीवन संपवले.
पिकांवर धुक्यांचा परिणाम : हरभरा पिकावर अळी पडली आहे. धुईनं सगळं चाललं आहे वाटाणा, कोबी हे पीकं चालले आहेत आणि पिकाला पाणी कमी पडू लागले आहे, लाईट व्यवस्थित टिकत नाही विहिरीवर 50 हेलपाटे मारावे लागतात, जायचं यायचं सारखे वेडे घालावे लागतात, पीक येतंय चांगला आलं की त्याचं नुकसान होतंय आणि एवढं कष्ट करूनही त्याचा उपयोग होत नाही.
पिकांची नासाडी : सध्या हरभऱ्यावर आळी पडली पत्ता कोबीवर अळी पडली, वाटाण्यावर अळी पडली, कांदा हे पीक वाया चालली आहेत. नेमके आता शेतकऱ्याने तरी काय कराव असा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे. परतीच्या पावसाने पहिले पीक गेले कोबी वर आळी पडली कांद्यावर करपा पडला. या नुकसानीमुळे शेतकऱ्याची सगळी वाट लागली आहे. सध्या संकटात आला आहे शेतकरी, ज्वारीचे पोगे मर व्हायला लागली आहे, धुई मुळे याच्यावर परिणाम व्हायला लागला आहे, लाईट पण व्यवस्थित टिकत नाही अशा अडचणी आमच्यासमोर आहेत आता काय करावे हाच प्रश्न आमच्यापुढे आहे
शेतकरी हतबल : आमच्या पुढे अशा अडचणी आहेत की, त्या आम्हाला सांगता सुद्धा येत नाहीत. एकीकडे धुईमुळं सगळ्या पिकाच नुकसान होतं तर दुसरीकडे लाईट व्यवस्थित टिकत नाही अनेक वेळा विहिरीवर हेलपाटे मारावी लागत आहेत. अशा नुकसानीमुळे पन्नास टक्के जर असं नुकसान झालं तर आणि शेतकऱ्यांनी करायचं काय...? आता पीक आले तर पाणी कमी पडायला लागलं आहे, आगोटीला असं आणि आता रब्बीला असं... याच्यावर शेतकऱ्याचं खरं आहे पिकंं जर चांगले आले तर धुईचा परिणाम होतो तर लाईट कमी मुळे पिकाला व्यवस्थित पाणी देता येत नाही.