ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून शिवीगाळ करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा - beed beating news

गस्तीवरील दोन पोलिसांसह एका होमगार्डला मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री अंबेजोगाई तालुक्यातील कुंभेफळ शिवारात घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

beed
beed
author img

By

Published : Jan 28, 2021, 3:18 PM IST

बीड - 'मध्यरात्रीपर्यंत ढाबा का सुरू ठेवला, ढाब्यासमोर आरडाओरड का करता,' अशी विचारणा करणाऱ्या गस्तीवरील दोन पोलिसांसह एका होमगार्डला मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री अंबेजोगाई तालुक्यातील कुंभेफळ शिवारात घडली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

'तुम्ही आम्हाला विचारणारे कोण?'

अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस नाईक तानाजी तागड, हवालदार नारायण गायकवाड तसेच होमगार्ड आर. एस. चामनर हे बुधवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. लोखंडी सावरगाव, वरपगाव, माकेगाव, नांदडी फाटा मार्गे ते कुंभेफळ येथे आले. यावेळी त्यांना एक ढाबा मध्यरात्री साडेबारा वाजता सुरू असल्याचे आढळले. तसेच ढाब्यासमोर कार (क्र. एमएच ४४ जी-३२५३) उभी होती. त्यात बसलेले काही लोक जोरजोराने आरडाओरड करत होते तसेच हॉर्न वाजवित होते. पोलीस नाईक तानाजी तागड व सहकाऱ्यांनी ढाबामालक पंकज अविनाश मोरे यास इतक्या उशिरापर्यंत ढाबा कसा काय सुरू ठेवला, अशी विचारणा केली. तसेच कारमधील चौघे गोंधळ का घालताहेत? असा प्रश्न केला. त्यावर चौघेही कारमधून सुसाट निघून गेले व पुन्हा परत आले. 'तुम्ही आम्हाला विचारणारे कोण, आमचे वरपर्यंत हात आहेत, तुमच्याकडे पाहतो' असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरु केली. त्यावर पोलिसांनी शिवीगाळ करू नका, असे बजावले असता ढाबामालकासह कारमधील चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात तागड यांच्या डोळ्याला, पोटाला व उजव्या हाताच्या मनगटाला जखम झाली. त्यानंतर पाचही जणांनी पोबारा केला.

खड्ड्यात पडल्याने पोलिसांच्या हाती

यावेळी बालाजी लोखंडे हा पळून जाताना खड्ड्यात पडल्याने पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी पोलीस नाईक तागड यांच्या फिर्यादीवरून बालाजी लोखंडे, श्याम भोसले, महेश देशमुख, अण्णा थोरात (सर्व रा. अंजनपूर) व ढाबा मालक पंकज मोरे (रा. कुंभेफळ) यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे या कलमान्वये ग्रामीण ठाण्यात गुरूवारी सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.