ETV Bharat / state

Beed Crime : भोळसर मुलाने डोक्यात खोरे घालून केली जन्मदात्या बापाची हत्या - crazy son killed his father

माजलगाव तालुक्यातील टाकरवन या गावामध्ये मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या साखरझोपेत असलेल्या बापावर खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यावर घाव करून खून केल्याची घटना गुरुवारी माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथे पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान घडली. आरोपी मुलास माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Beed Crime
जन्मदात्या बापाची हत्या
author img

By

Published : Feb 3, 2023, 3:27 AM IST

बीड: मारोती लक्ष्मण भुंबे (वय 55, रा. टाकरवन ता. माजलगाव) असे मृत वडिलाचे नाव आहे. मयत मारोती यांचा भोळसर मुलगा आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे (वय 31) मागील आठ दिवसांपासून गायब होता. तो नेहमीच घरातून कोणालाही न सांगता निघून जात असे अशी माहिती परिसरातून मिळते. मयत वडील मारोती लक्ष्मण भुबे यांचे भोळसर मुलावर प्रेम होते. त्यांनीच त्याला सापडून घरी आणल्याचे ऐकायला मिळते. गुरुवारी ( 2 फेब्रुवारी) रोजी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान साखरझोपेत असणाऱ्या बापावर एकाएकी भोळसर मुलाने खोऱ्याच्या तुंब्यानी डोक्यावर प्रहार करायला सुरुवात केली. यावर घरात असलेल्या नातेवाईकाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला.

वडिलांचा जागीच मृत्यू : जखमी अवस्थेतील मारोती भुंबे उपचारार्थ माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतानाही पुन्हा त्या भोळसर मुलाने जखमी बापाच्या डोक्यात खोऱ्याने प्रहार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

खूनाचे कारण अज्ञात : माजलगाव ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खटकल, पोलीस उपनरीक्षक सचिन दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल बी. बी. खराडे यांनी धाव घेत आरोपीस ताब्यात घेतले. या खुनाचे कारण समोर आले नाही. आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण भुंबे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बांग्लादेशी नागरिकाला अटक : भारतात घुसखोरी करत मागील काही वर्षांपासून मुंबईच्या बोरिवाली भागात अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या एक बांगलादेशी नागरिकास बोरिवली एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. जकारिया जहांगीर मुल्ला (35 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नाव आहे.

पोलिसांनी रचला सापळा : मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून बोरिवली पश्चिमेकडील लिंक रोड परिसरात नियमितपणे ये-जा करत असल्याची बातमी गुप्त माहितीदाराकडून समजली. माहितीची खात्री करून सपोनी. सिद्धे, पोउनि डॉ. दिपक हिंडे यांना वरिष्ठांनी छाप्यासंदर्भात सूचना दिल्या. यानुसार पोलिसांनी बोरिवली पश्चिमेकडील गणपत नगर भागात सापळा लावून संशयितरित्या आढळून आलेल्या व्यक्तीस अटकाव केला. त्याच्याकडे तो भारतीय असल्याची ओळख दाखवणारे पुरावे मागितले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याच्या बोलीभाषेवरून तो परदेशी नागरिक असल्याची खात्री झाल्याने दोन माणसांना बोलावून संशयिताला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी त्याने बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली आणि मागील अनेक वर्षांपासून तो मिरा रोड येथे राहत असल्याचे सांगितले. मुंबईत तो कडिया म्हणून काम करत असल्याचेही कबूल केले. तो बांग्लादेश मार्गे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून मुलखी अधिकान्याच्या परवानगीशिवाय भारतात प्रवेश करुन कलकत्ता मार्गे मुंबईत प्रवेश केल्याचे सांगितले.

हेही वाचा : Mumbai Crime: 18 दिवसांनी मृत्यूशी झुंज संपली, ॲसिड हल्ल्यातील जखमी महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.