बीड - आमच्यासारख्यांच्या घरावर तुळशीपञ जरी ठेवले तरी चालेल पण सर्व सामान्य जनतेचे जीव वाचविले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व राजकारण्यांनी आपआपल्या परीने होईल मदत करण्याची गरज असून, यात राजकारण आणण्याची गरज नाही. रूग्णांना ऑक्सिजन, बेडसह इतर साधनांची कमी पडू न देणाची आपण जबाबदारी पाडत असून, जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट सुरू करत असून त्याचे कामही सुरू झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे प्रतिपादन पालकमंञी धनजंय मुंडे यांनी केले.आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वतीने शहरातील बी. डी. हांबर्डे महाविद्यालयात ५० बेडचे आधार कोविड सेंटरचे आज पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या हस्ते करण्यात उद्घघाटन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
रूग्ण लवकरात लवकर बरा होवो - मुंडे
लाटे-लाटेमध्ये सुध्दा फरक आहे. पहिल्या लाटेत एक मास्क लागत होता आणि दुस-या लाटेत दोन मास्क लावावे लागत आहे. दुस-या लाटेत रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासायला लागली तसेच मत्यूचे प्रमाण वाढत आहे. पण आज माझ्या हाताने या आधार कोव्हीड सेंटरचे उद्याटन झाल्याचा मला अभिमान आहे. या कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा देणा-या डॅाक्टरांच्या हातून चांगली सुविधा मिळवून रूग्ण लवकरात लवकर बरा होवो ही प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात बाहेरून ऑक्सिजन आणण्याची गरज भासणार नाही- मुंडे
बीड जिल्ह्यात जरी रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुढील एक महिन्यानंतर जिल्ह्याला ऑक्सिजन बाहेर जिल्ह्यातून आणण्याची गरज पडणार नाही. कारण पुढील एक महिन्यात जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट सुरू करत असून त्याचे कामही सुरू झाल्याचे मुंडे यांनी सांगितले.
आष्टी ग्रामिण रूग्णालयात दोन ते अडीच कोटींचा खर्च
आ. बाळासाहेब आजबे म्हणाले, की हे कोविड सेंटर सुरू करण्यास वास्तविक पाहता उशीर झाला आहे. यातील वास्तव आपल्याला माहित आहे. आष्टीमध्ये जवळपास पाच कोविड सेंटर सुरू आहेत. तसेच आष्टी ग्रामीण रूग्णालयात धनजंय मुंडेंच्या मदतीने जवळपास दोन ते अडीच कोटींचा खर्च करण्यात आला आहेत. देव न करो तिसरी लाट जर आली तर आपल्याला लहान मुलांच्यासुद्धा उपचाराची तयारी आपल्याला करावी लागणार आहेत. जिल्हा शल्यचिकीत्सकांचे काम चांगले असल्याचेही त्यांनी सांगीतले.
राजकारण न करता मदत करा - आ. रोहित पवार
यावेळी आ. रोहित पवार म्हाणाले, सध्याची परिस्थिती भयानक असून काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मात्र, आपण नेहमी प्रयत्न करायचे असतात. माझ्याकडून जी काही मदत लागेल ती मी देण्याचा प्रयत्न करणार असून, चांगल्या कामाचे राजकारण न करता सर्वांनी मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रुग्ण दगावला तर फी घेणार नाही - आ. आजबे
आधार कोविड सेंटर आम्ही सेवाभाव उद्देशाने सुरू केले आहे आणि आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणेच बिल घेणार आहोत. दुर्देवाने जर उपचार घेत असलेल्या रूग्ण दगावला तर त्याचे कसलेही बील आम्ही घेणार नसल्याचे आमदार आजबे यांनी जाहीर केले.
हेही वाचा- राज्यपाल सचिवालयात विधानपरिषद नामनियुक्त सदस्यांची यादीच उपलब्ध नाही!