ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष - कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर मिळून देण्यासाठी आ. संजय दौंड यांचा पुढाकार

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई विभाग हा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा हॉटस्पॉट बनला आहे, अशी टीका अनेकवेळा होत आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन आणि आमदार संजय दौंड सातत्याने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय
author img

By

Published : May 12, 2021, 5:11 PM IST

बीड- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई विभाग हा कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा हॉटस्पॉट बनला आहे, अशी टीका अनेकवेळा होत आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन आणि आमदार संजय दौंड सातत्याने प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.

आशिया खंडातील पहिल्या पाच रुग्णालयामध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा समावेश होते. रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, पीएमकेअर सेंटरकडून आम्हाला मिळालेले व्हेंटिलेटर खराब निघाल्याने आमच्या आडचणीमध्ये आणखी वाढ झाली.

ऑक्सिजनसाठी दौंड यांचा पाठपुरावा

मागील पंधरवाड्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे, ऑक्सिजनची कमतरता आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये झालेली वाढ यामुळे चर्चेत आले होते. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन कोरोनाची बिकट परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे. यामध्ये आ. संजय दौंड यांनी ऑक्सिजन मिळवण्यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून, ऑक्सिजनची उपलब्धता करून दिली. संजय दौंड हे नेहमीच कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी हजर आहेत, त्यांनी कोरोनाकाळत त्यांची स्वतःची एक टीम बनवली असून ती ग्रामीण भागात सेवा देत आहे. तसेच दौंड यांच्या प्रयत्नातून अनेकांना आतापर्यंत ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता झाली आहे.

आ. दौंड यांच्या पुढाकारातून कोरोनाबाधितांना मिळाला ऑक्सिजन

कोण आहेत आमदार संजय दौंड?

काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे आ. संजय दौंड हे चिरंजीव आहेत. आमदार संजय दौंड यांचा सर्वाधिक काळ बीड जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ. संजय दौंड यांना विधानपरिषदेवर घेतले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वीपासूनच आ. संजय दौंड यांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून गोरगरीब रुग्णांच्या गरजांना प्राधान्य दिले आहे. तसेच ते आता कोरोनाकाळात दिवस रात्र रुग्णांची सेवा करताना दिसत आहेत. अंबाजोगाईच्या या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयावर 4 ते 5 तालुक्यांचा भार आहे. बीड जिल्ह्यातील धारूर, केज, माजलगाव, अंबाजोगाई तसेच परळी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात रुग्ण स्वाराती मध्ये उपचाराला येतात. आज घडीला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 398 एवढे कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती

बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 160 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, जिल्ह्याचा डेथ रेट 1.71 टक्के एवढा आहे, तर रिकव्हरी रेट 88. 58 टक्के आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 59 हजार 987 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा - आरपीएफ जवानाची सतर्कता; धावत्या रेल्वेतून फलाटाच्या गॅपमध्ये जाणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.