बीड : जिल्ह्यात सध्या अनेक शाळा कॉलेज यांच्या काही अंतरावर पिझ्झा कॉर्नर, कॉफी सेंटर असे कॅफे निर्माण झाले आहेत. या कॅफेंमध्ये किशोरवयीन मुलं-मुली आपला टाईमपास करताना पाहायला मिळतात. (Beating person who blackmails girls ) मात्र याचा फायदा काही रोड रोमिओ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरुण-तरुणींचा फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. असाच एक प्रकार परळीतील कॉफी सेंटरवर घडल्याचे समोर आले आहे. (Blackmailing by taking pictures of girls) यामध्ये एक युवक मुलींचे फोटो काढत असताना नागरिकांनी पकडून त्याला बेदम मारल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अश्लील चाळे करताना फोटो काढले : कॉफी सेंटरमध्ये या किशोरवयीन मुला-मुलींना निवांत वेळ घालवता यावा यासाठी या सेंटरमध्ये उत्तम सोयीनुसार केबिन तयार करून हे कॅफे सर्रास चालू आहेत. मात्र या कॅफेच्या माध्यमातून अश्लील चाळे देखील मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतात. चारशे-पाचशे रुपये खर्च करून मनसोक्त बसता यावे यासाठी ही तरुणाई या कॅफेंचा वापर करताना पाहायला मिळते. मात्र, यामध्येच हे तरुण मुलं-मुली कोणत्या ना कोणत्या संकटाला कवटाळत आहेत. यात अनेक रोड रोमिओ नशेडी या तरुणाईचे अश्लील चाळे करताना फोटो काढतात आणि पुन्हा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार हा काही अंशाने उघड झालेला आहे.
तरुणाई ब्लॅकमेलिंगची बळी : आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी अशा ब्लॅकमेलिंगला बळी पडलेले आहेत. मात्र तरी देखील असल्या कॅफेंना पोलीस प्रशासन का आळा घालत नाही हे प्रश्नचिन्ह आहे. असाच प्रकार परळीतल्या एका कॅफेवर घडला. परळी शहरातील अरुणोदय मार्केट या परिसरात हा कॅफे आहे. याच कॅफेत काम करणारा व्यक्ती हा नेहमीच आलेल्या मुलींचे फोटो काढत होत. याची माहिती मिळताच नागरिकांनी कॅफेत जाऊन त्याला मनसोक्त चोप दिला आहे. अशा घटना जर या कॅफेमध्ये घडत असतील तर पालकांनी आपली मुलं काय करतात याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा: