बीड- जगभर ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजावर ख्रिसमसच्या दिवशी आनंदत्याग आंदोलन करण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात लहान मुलांनीही सहभाग घेतला होता.
बीड शहरातील ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा करूनही जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. विधिमंडळात ख्रिश्चन समाजाचा एकही प्रतिनिधी नाही, याशिवाय ख्रिश्चन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजातील वंचित कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे ही मागणी या समाजाची आहे.
हेही वाचा - नाशिकच्या 'या' ठिकाणी आहे भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेले बाळ येशूचे मंदिर
इतरांना आनंद देणारा सांताक्लॉज स्वतः काही तरी मागण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसला आहे. अनेक वेळा निवेदन दिल्यानेही प्रश्न सुटले नाही, यामुळे संतापलेल्य ख्रिश्चन समाजाने उपोषणाचे हत्यार उपसले, अशी प्रतिक्रिया अल्फा अमेगा महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिली.