ETV Bharat / state

CBI And ED Raid Beed: बीड जिल्ह्यात सीबीआय आणि ईडी पथकाची साखर कारखान्यावर छापेमारी - साखर कारखान्यावर सीबीआय आणि ईडीची छापेमारी

बीड जिल्हा हा राजकीय क्षेत्रामध्ये नावाजलेला जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये साखर उत्पादन करणारे कारखाने देखील मोठ्या संख्येने आहेत. यापैकीच शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआय पथकाने आज (गुरुवारी) छापा मारल्याची माहिती मिळत आहे.

CBI And ED Raid Beed
शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयची धाड
author img

By

Published : Mar 30, 2023, 5:35 PM IST

Updated : Mar 30, 2023, 6:46 PM IST

बीड: जिल्ह्यातील एका साखर कारखान्यातील घोळाविषयी थेट सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीकडे तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत या दोन्ही केंद्रीय एजन्सीचे दहा ते पंधरा अधिकारी बीड जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून दाखल झालेले होते.

अधिकाऱ्यांची कारखान्यात तपासणी: त्यांनी गुरुवारी प्रत्यक्षात कारखान्यावर जाऊन तपासणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात या दोन्ही एजन्सीजच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या धारूर तालुक्यात असलेल्या मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर रात्रीपासूनच ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

पांडुरंग सोळुंकेंना पदावरून हटविले: मिळालेल्या माहितीनुसार धारूर तालुक्यातल्या मुंगी गावच्या पांडुरंग सोळंके यांनी 2010 साली शिवपार्वती सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. यानंतर सोळंके यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांना सोबत घेऊन एका 'एमओयु'वर स्वाक्षरी केली. या घटनेनंतर काही महिन्यांनी नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बनावट दस्तऐवज तयार करून साखर कारखाना स्वतःच्या नावे केला. यानंतर त्यांनी पांडुरंग सोळुंके यांना पदावरून दूर केले.

अन् कारखाना दिवाळखोरीत काढला: यानंतर तासगावकर कुटुंबीयांनी 2013 साली याच कारखान्याच्या नावावर 106 कोटी रुपयांचे पंजाब नॅशनल बँक आणि इतर दोन बँकांकडून कर्ज घेतले. माहितीप्रमाणे नंदकुमार तासगावकर आणि राजेश तासगावकर यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च केले. यानंतर त्यांनी कारखान्याचे काम अर्धवट सोडले आणि कारखाना दिवाळखोरीत काढला.

अनेक बाबी होणार उघड: त्यांनतर हे प्रकरण कोर्टात गेलं. मात्र या कारखान्याचे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित असतानाच ज्या बँकेकडून कर्ज घेण्यात आला होते त्या बँकांनी हा कारखाना लिलावात काढला. शिव पार्वती साखर कारखाना लिलावात काढल्यानंतर आता ईडी आणि सीबीआय यांच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात प्रवेश केला आहे. या प्रकरणात सोळंके की तासगावकर यापैकी कोणाची चौकशी केली जात आहे, ही बाब ईडी आणि सीबीआय च्या छाप्यानंतरच उघड होणार आहे.

हेही वाचा: Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माला हायकोर्टाने फटकारले; लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश

Last Updated : Mar 30, 2023, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.