ETV Bharat / state

बीड: चंदन चोरी प्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल; एकाला अटक

अंबाजोगाई तालुक्यातीलअहमदपूर मार्गावरील पिंपळा येथे अवैधरित्या चंदन घेऊन जाणार्‍या एका वाहन पोलिसांनी पकडले असून या प्रकरणी केज येथील एका माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

Case filed against Ex corporator in illegal chandan selling case

author img

By

Published : Oct 9, 2020, 11:38 PM IST

बीड- अवैधरित्या चंदन घेऊन जाणार्‍या एका वाहनावर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कारवाई केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातीलअहमदपूर मार्गावरील पिंपळा येथे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी केज येथील एका माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर 64 हजार रुपये किमतीचे 32 किलो चंदन जप्त केले.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, एक पांढर्‍या रंगाची बोलेरो गाडी अंबाजोगाईच्या दिशेने निघाल्याची गुप्त माहिती उपविभागीय अधिकारी सनिल जायभाये यांना मिळाली होती. या गाडीतुन अवैध बाजारात चंदन विक्रीसाठी नेण्यात येत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळा धायगुडा परिसरात सापळा रचला. या दरम्यान, बोलेरो गाडी क्रं. (एमएच 31 डीव्ही 8331) अंबाजोगाईकडे येताना दिसताच पोलिसांनी तिला अडविले. गाडीची झडती घेतली असता पाठीमागील सीटवर पांढर्‍या पोत्यात ठेवलेले 64 हजार रुपये किमतीचे 32 किलो सुगंधित चंदन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी चंदन आणि बोलेरो असा एकूण 5 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक तुषार प्रभाकर बेड्या ठोकल्या.

चौकशी दरम्यान, केजचा माजी नगरसेवक बालाजी जाधव याच्या सांगण्यावरून आपण हे चंदन घाटनांदूर येथील अनोळखी व्यक्तीकडून घेतले असून ते बालाजी जाधव नावाच्या व्यक्तीला देण्यासाठी केजला वापस जात होतो असे आंबाड यान पोलिसांना सांगितले. याप्रकरणी पोलीस हवालदार लक्ष्मण टोले यांच्या फिर्यादीवरून चालक तुषार आंबाड, माजी नगरसेवक बालाजी जाधव, गाडी मालक समीर हनुमंत साळुंके त्यांच्यावर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम कलम 41,42 आणि भारतीय वृक्षतोड अधिनियम कलम 26(फ) अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.