ETV Bharat / state

अनोळखी युवतीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला; गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 6, 2021, 12:55 PM IST

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. वनमंत्री संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. अद्याप पूजाच्या आत्महत्येमागचे गूढ उलगडलेले नाही. त्यातच गुरुवारी पूजाची बहीण दिव्यांगी लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगी सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिव्यांगीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल करून एका युवतीने तिला 'तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे,' असे सांगून बोलावून घेतले. मात्र, नंतर तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

Beed Pooja Chavan Latest News
पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला

परळी वैजनाथ (बीड) - तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना गुरुवारी (दि. ४) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परळीतील एका शाळेजवळ घडली. या प्रकरणी परळी शहर ठाण्यात शुक्रवारी (दि. ५) त्या अनोळखी युवती विरोधात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, ती युवती कोण आणि तिने पूजाच्या बहिणीचा मोबाईल का पळविला? चोरी करण्यासारखे त्या मोबाईलमध्ये काय विशेष होते, असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत.

पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला

..तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. वनमंत्री संजय राठोड यांनाही राजीनामा द्यावा लागला. अद्याप पूजाच्या आत्महत्येमागचे गूढ उलगडलेले नाही. त्यातच गुरुवारी पूजाची बहीण दिव्यांगी लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला आहे. दिव्यांगी सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे वॉकिंगसाठी परळीतील हनुमानगड परिसरात गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता परत येत असताना दिव्यांगीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून एक कॉल आला. मला तुझी बहीण पूजाबद्दल बोलायचे आहे, असे समोरून बोलणाऱ्या अनोळखी युवतीने तिला सांगितले. थोड्या वेळाने भेटण्याचे त्यांचे ठरले.

हातातील मोबाईल हिसकावून काढला पळ

दिव्यांगी आणि सौरभ रात्री साडेआठ वाजता शाळेजवळ आले. त्यानंतर त्या अनोळखी युवतीने त्यांना कॉल करून शाळेच्या दुसऱ्या गेटजवळ बोलावले. तिथे तोंडाला स्कार्फ बांधलेली आणि काळ्या रंगाचे जर्किन घातलेली एक मुलगी अंधारात उभी होती. तिच्याशी बोलत असताना दिव्यांगीच्या मोबाईलवर तिचा भाऊ संग्राम याचा कॉल आला. तो कॉल घेत असताना त्या अनोळखी युवतीने दिव्यांगीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि दुसऱ्या गेटच्या दिशेने पळून जाऊ लागली. तेव्हा दिव्यांगी आणि सौरभने तिचा पाठलाग केला. परंतु, काही अंतरावर उभ्या असलेल्या एका दुचाकीस्वाराच्या मागे बसून ते भरधाव वेगात निघून गेले. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात या अनोळखी तरुणी आणि युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.