ETV Bharat / state

गर्दी जमवून संगीत कार्यक्रम, अंबाजोगाई पोलिसात गुन्हा दाखल - बीड कोरोना बातमी

गर्दी जमवून कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक, हॉटेल मालक आणि साऊंडसिस्टम मालकाच्या विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Feb 21, 2021, 6:44 PM IST

अंबाजोगाई (बीड) - राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असताना शासन आणि प्रशासन सतर्क झाले असून सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही नियम घालून दिले आहेत. पण, याच नियमांची पायमल्ली करणार्‍या माजी नगरसेवकासह हॉटेल मालक आणि साऊंडसिस्टम चालकाच्या विरोधात पोलीस नाईक विष्णू नागरगोजे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अंबाजोगाईमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

गतवर्षी मार्च ते जुलै या कालावधीत टाळेबंदीत असलेल्या जनतेला हळूहळू दिलासा देत टाळेबंदी संपवत मंगल कार्यालये, जीम, शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पण, असे असले तरी मास्क वापरणे आणि कोविडच्या संदर्भाने काळजी घेण्याचे बंधन ठेवण्यात आले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यानंतर शासन आणि प्रशासन सतर्क झाले आहे. लग्न समारंभाला जमा होणार्‍या लोकांना मर्यादेत ठेवण्याचे आवाहन नव्हे तर बंधन घालण्यात आले आहेत. प्रत्येकाने मास्क वापरलाच पाहीजे यासाठी पोलिसांना रस्त्यावर उभे रहावे लागले. 20 फेब्रुवारी रोजी अंबाजोगाई येथील हॉटेल प्रविण बार व रेस्टॉरंट या हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये लग्नापूर्वी संगित रजनीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमा झाली. विशेष म्हणजे या गर्दीचा बोभाटा बाहेर गावाहून आणलेल्या साऊंडसिस्टमने केला. गाण्यांचा मोठा आवाज परिसरातील लोकांच्या कानावर पडल्यानंतर फोनवरून हा आवाज पोलिसांना ऐकविण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कार्यक्रम तर थांबविला. त्यानंतर हॉटेल मालक कोपले व ज्यांच्या घरी लग्न होते असे अशोक शामलाल मोदी, प्रदिप शामलाल मोदी यांच्यासह साऊंडसिस्टीम चालक ऋषीकेश चाफेकानडे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणे आणि कोविड संदर्भातील नियमांची पायमल्ली करणे यासाठी असलेले कलम 188, 269, 270 51ब तसेच साथरोग प्रतिबंधक अधिनियम 17, 135 नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - आष्टी; आरोग्य विभागाच्या जागेत खोदले खड्डे; जागा हडपण्याचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.