बीड- कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील कार रस्त्यालगत असलेल्या रोहित्राला धडकली. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. गेवराई तालुक्यातील तांदळा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघातात एकजण गंभीर जखमी आहे. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- शेतकरी अडचणीत : ‘सीसीआय’ची तीन आठवड्यांपासून कापूस खरेदी बंद
आंबेजोगाई वरुन नगरकडे कार जात होती. दरम्यान, तांदळा गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या रोहीत्राला धडकली. कार धडकल्याने रोहित्र तुटून कारवर कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी होते. यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रिजवान आयुब पटेल (ता.अंबेजोगाई सायगाव), विजयकुमार श्रीरंग नागरगोजे (वय 36 रा.नागदरा तालुका परळी वै), गणेश मोहन सिरसाट (रा. फावडेवाडी ता रेणापूर) अशी मृतांची नावे आहेत.