ETV Bharat / state

BJP Leader Pankaja Munde : 'माझी चिंता करू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करेल'

author img

By

Published : Jun 3, 2022, 6:49 PM IST

Updated : Jun 3, 2022, 7:39 PM IST

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( MP Chief Minister Shivraj Singh Chouhan ) यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde ) यांनी दाखवलेल्या मार्गाने ओबीसी प्रश्न सोडवता येऊ शकतो, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना दिला. तर मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची ताकद मला मुंडे साहेबांनी दिली आहे, असे वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे ( BJP leader Pankaja Munde ) यांनी केले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde

बीड - गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( MP Chief Minister Shivraj Singh Chouhan ) यांनी पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde ) यांनी दाखवलेल्या मार्गाने ओबीसी प्रश्न सोडवता येऊ शकतो, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांना दिला. तर माझी चिंता करू नका, मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची ताकद मला मुंडे साहेबांनी दिली आहे, असे वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे आणि शिवराजसिंह चौहान

'गोपीनाथ मुंडे यांचे विचार महत्वाचे' : गोपीनाथ गडावर आलेल्या मुंडे समर्थकांसह नागरिकांना संबोधित करत असताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची आठवण करून दिली. आजचा दिवस चांगला नाही, काळा सूर्य घेऊन आलेला दिवस आहे. गोपीनाथ मुंडे गोरगरीबांचे होते. उस तोड कामगार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांनी केला. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. त्यामुळे मला कोणाचे मन तोडणे जमले नाही. माझी चिंता करू नका, मला माझी चिंता नाही. मिळालेल्या संधीचे सोन करणे ही मुंडे साहेबांची शिकवण माझ्याकडे आहे. माझा हट्टहास फक्त त्यांची शिकवण आहे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. तर शिवराजसिंह चौहान चांगले काम करत आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षाचा प्रश्न सोडवला. महाराष्ट्र सरकारने प्रेरणा घ्यावी, असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगितले.

'ओबीसी आरक्षणचा प्रश्न सोडवता येईल' : गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेतून ओबीसी आरक्षणचा प्रश्न सोडवता येईल, असे वक्तव्य मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. ओबीसी आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक केला आहे. ओबीसी प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसलो नाही. न्यायालयाने ट्रिपल टेस्ट बाबत सूचना केल्या. आम्ही ओबीसी आयोग नेमाला, न्यायालयात आयोगाने 35 टक्के आरक्षण देण्याबाबत सूचना केल्याच सांगितले. त्यात असलेल्या काही त्रुटी आम्ही रात्रीतून पूर्ण करत दिल्ली गाठली. तेव्हा 35 आरक्षण ओबीसींना देता आले, असे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रात माझ्या जवळच्या दोन व्यक्ती होते, ते म्हणजे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे. मुंडेंनी भाजपा गावागावात पोहचवले. युती सरकार त्यांच्यामुळेच सत्तेत आले. गोपीनाथ मुंडे यांनी इतिहास लिहिला आहे. तो कोणालाही मिटवता येणार नाही, अशी भावना शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - Minister Vijay Vadettiwar : सरसंघचालकांच्या भूमिकेचे स्वागत, परंतु त्यांनी ठाम राहावे - विजय वडेट्टीवार

Last Updated : Jun 3, 2022, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.