ETV Bharat / state

जळगाव वसतिगृह प्रकरण : अत्याचार अत्यंत किळसवाणा; आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्या - पंकजा मुंडे - पंकजा मुंडे जळगाव वसतिगृह प्रकरण

जळगावातील एका वसतिगृहात पीडित महिलांना आश्रय देते. मात्र, या वसतिगृहात महिलांमध्ये वाद झाले, त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच जननायक फाउंडेशनच्या सदस्यांनी या वसतिगृहात गैरप्रकार होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

pankaja munde
पंकजा मुंडे
author img

By

Published : Mar 3, 2021, 8:07 PM IST

बीड - जळगाव येथील सरकारी वसतिगृहातील मुलींसोबत करण्यात आलेला अत्याचाराची घटना अत्यंत किळसवाणा आहे. यात सरकारी अधिकारीही सामील असल्याचे समजते. यातील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

bjp leader pankaja munde on jalgaon hostel case
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट.

काय आहे प्रकरण?

जळगावातील एका वसतिगृहात पीडित महिलांना आश्रय देते. मात्र, या वसतिगृहात महिलांमध्ये वाद झाले, त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तसेच जननायक फाउंडेशनच्या सदस्यांनी या वसतिगृहात गैरप्रकार होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. वसतिगृहात दोन महिलांमध्ये वाद झाले. या वादातून हाणामारी देखील झाली. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष लतीफ पिंजारी, मंगला सोनवणे, फरीद खान, कादरीया फाउंडेशनचे फारुख कादरी, आबीद शेख, वर्षा लोहार हे एका पीडितेस भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका महिलेने खिडकीतून आवाज देऊन आपल्या समस्या मांडल्या. या वसतिगृहात काही गैरप्रकार घडत आहेत, निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, अशा तक्रारी महिला करीत होती. यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी मोबाइलमध्ये व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल -

महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर जननायक फाउंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, या वसतिगृहातील प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यासाठी वरिष्ठ महिला अधिकारी, डॉक्टरांचे पथक चौकशीसाठी नेमले आहे. चौकशीत आरोपात तथ्य असल्यास संबंधितावर कडक कारवाई करू. तसेच वसतिगृहात 24 तास पोलिसांचे पथक ठेवले आहे. संबंधित महिला पोलिसांकडे तक्रार करू शकतात. चौकशी पथकाने आतापर्यंत दोन-तीन वेळा याप्रकरणात चौकशी केली आहे.

हेही वाचा - जळगाव वसतिगृह प्रकरण : भाजप आमदार श्वेता महाले यांच्याशी विशेष चर्चा

चौकशीत दोषी आढळल्यास गुन्हे - पोलीस अधीक्षक

जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सांगितले की, शहरातील वसतिगृहातील प्रकाराची वरिष्ठ महिला अधिकारी चौकशी करीत आहे. जी महिला व्हिडिओत सांगते आहे ते नेमके कोणाबद्दल ते कळत नाही. या प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली आहे. चौकशीत जे समोर येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. वरिष्ठांना देखील याची माहिती देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.