ETV Bharat / state

वृक्षवल्ली आम्हा सोयरे... बीडमध्ये साजरा केला चक्क झाडांचा वाढदिवस

गेल्या ३ वर्षांपूर्वी आष्टी येथील धनश्री पंतसंस्थेने १ जुलैला वृक्ष लागवडीचा कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याद्वारे आतापर्यंत ३७५ झाडे लावण्यात आले. तसेच त्याचे संगोपन केले. तसेच त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडाला आज १ वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

झाडांचा वाढदिवस साजरा करताना धनश्री पतसंस्थेचे कार्यकर्ते
author img

By

Published : Jul 1, 2019, 4:49 PM IST

Updated : Jul 1, 2019, 5:15 PM IST

बीड - आतापर्यंत अनेक वाढदिवस साजरे केलेले तुम्ही बघितले असले. मात्र, जिल्ह्यातील आष्टी येथे झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. धनश्री पंतसंस्थेच्यावतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. तसेच याद्वारे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संदेश देण्यात आला.

धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे

गेल्या ३ वर्षांपूर्वी आष्टी येथील धनश्री पंतसंस्थेने १ जुलैला वृक्ष लागवडीचा कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याद्वारे आतापर्यंत ३७५ झाडे लावण्यात आले. तसेच त्याचे संगोपन केले. तसेच त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडाला आज १ वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच शहरातील खडकत रोड परिसरातील इतर झाडांना सजवण्यात आले. त्यांना फुगे बांधण्यात आले. तसेच परिसर स्वच्छ करण्यात आला. एवढेच नाहीतर झाडांसमोर रांगोळ्या देखील रेखाटण्यात आल्या. तसेच सर्व झाडांना औक्षण करण्यात आले. एवढेच नाहीतर माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस आणि पतसंस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्या केक देखील कापण्यात आला. तसेच यंदा ९० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.

धनश्री पतसंस्थेच्या या अनोख्या कार्यक्रमात गावातील नागरिकांनीही सहभाग घेतला. त्यामुळे या उपक्रमाची चांगली सुरुवात झाली असल्याचा आनंद धनश्री पतसंस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी व्यक्त केला.

Intro:
बाईट- रंगनाथ धोंडे, अध्यक्ष धनश्री पतसंस्था

अनोखा उपक्रम;बीडमध्ये साजरा केला झाडांचा वाढदिवस

बीड-आजवर तुम्ही अनेक वाढदिवस पाहिले असतील.पण, बीड जिल्ह्यातील आष्टी येथे हटके वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस कोण्या व्यक्तीचा नाही तर तो आहे झाडाचा... होय झाडाचाच... ऐकून नवल वाटेल पण आष्टी येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात झाडाचा वाढदिवस साजरा करून एक अनोखा उपक्रम धनश्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवला आहे. या त्यांच्या उपक्रमामुळे सबंध राज्यालाच नव्हे तर देशाला या उपक्रमातून वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश मिळत आहे...

यामध्ये वाढदिवसात नेहमीच्या वाढदिवसाप्रमाणे फुगे, फेटा इतकेच नव्हे तर केक देखील होता. पण,विशेष असे की, हा वाढदिवस कोणा एखाद्या व्यक्तिचा नसताना देखील व्यक्ती प्रमाणेच झाडांचा वाढदिवस साजरा केला त्या वडाच्या झाडाला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने धनश्री पतसंस्थेच्या वतीने त्या झाडाचा मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. आष्टीकरांच्या या वृक्ष प्रेमाची मोठी चर्चा महाराष्ट्रात होत आहे.

आष्टी शहरातील "धनश्री"पतसंस्थेने गेल्या तीन वर्षापासून 1 जुलै रोजी वक्ष लागवड कार्यक्रमात हिरीरेने सहभाग घेत अजून,गेल्या तीन वर्षात जवळपास 375 झाडे शहरात लावून त्यांचे संगोपणही ही संस्था करीत आहे.यावर्षीही नव्वद झाडे लावणार असल्याचेही संस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे यांनी सांगितले. यावर्षी 1 जूलै रोजी "धनश्री" ने तीन वर्षापुर्वी लावलेल्या झांडाचा वाढदिवस खडकत चौक येथे करण्यात आला. यावेळी केक माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस व पतसंस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्याहस्ते कापून साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण सुरतवाले, रमेश बोराडे, शांतीनाथ धोंडे, सामाजिक कार्यकर्ते भारत मूरकूटे,खंडू जाधव, पंचायत समिती सदस्य अशोक मूळे,नगर पंचायत स्वच्छता सभापती शेख शरीफ,नगर पंचायत कार्यालीय प्रमूख के.टी.सांवत यांच्यासह आदी उपस्थित होते.

झाडाच्या नावानं केकही कापला-
शहरातील खडकत रोड परिसरात झाडांना सजवण्यात आले.त्यांना फुगे बांधण्यात आले.परिसर स्वच्छ करण्यात आला.कारण या झाडांना लावून आता तीन वर्ष झालंय. यानिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी हा सगळा प्रकार "धनश्री"ने केला. झाडांसमोर रांगोळ्याही रेखाटण्यात आल्या. झाडांना औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आले. यावेळी ही झाडं जगवण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांनी झाडाच्या नावानं केकही कापले. तब्बल तीन वर्षात शहर परिसरात ही 375 झाडं लावण्यात आली होती. अनेक अडचणीनंतरही ही झाडं तगली आणि म्हणूनच या झाडांचा हा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला.

झाडांच्या संगोपणासाठी नागरीकांचाही हातभार-

परिसरातील "धनश्री"पतसंस्थेसह नागरीकांनीही ही झाडं जगवण्यासाठी मेहनत घेतली.आणि त्यामुळंच हा वाढदिवस साजरा करतांन त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावली जातात.मात्र त्यांना जपण्याकडं दुर्लक्षच होत असतं,मात्र या ठिकाणी झाडं लावण्याचही आली आणि ती जगवण्यातही आली,अजूनही बराच पल्ला गाठायचाय.मात्र, एक चांगली सुरुवात झाल्याचा आनंद झाडांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून पहायला मिळाला.
-रंगनाथ धोंडे,अध्यक्ष धनश्री पतसंस्था
Body:बConclusion:ब
Last Updated : Jul 1, 2019, 5:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.