ETV Bharat / state

बीडचे नवे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी स्वीकारला पदभार

राजा रामास्वामी हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले असून शनिवारी त्यांनी बीड पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारला. यावेळी बीड पोलीस दलाकडून त्यांना सलामी देत स्वागत करण्यात आले.

बीडचे नवे पोलीस अधीक्षक
बीडचे नवे पोलीस अधीक्षक
author img

By

Published : Sep 20, 2020, 4:06 AM IST

बीड - पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाल्यानंतर राजा रामास्वामी हे बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले असून शनिवारी त्यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी बीड पोलीस दलाकडून त्यांना सलामी देत स्वागत करण्यात आले.

मागील 14 महिने हर्ष पोद्दार यांनी बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम केले आहे. कोरोनाच्या काळात निर्माण झालेली बिकट परिस्थिती हाताळण्यात पोद्दार हे यशस्वी ठरले होते. हर्ष पोद्दार यांची बीडमधून बदली झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना पुढील नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी मुंबई येथून गुप्तचर विभागातील राजा रामास्वामी हे नवे बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. शनिवारी त्यांनी बीड पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारला.

बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था हाताळताना राजा रामास्वामी काय निर्णय घेतील हे पाहावे लागेल. जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा यासह अन्य अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ते काय उपाययोजना करतील याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

हेही वाचा - पतीने आपल्याच पत्नीवर मित्राला करायला लावला अत्याचार; जळगावातील संतापजनक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.