ETV Bharat / state

बचत गटांचे जुने कर्ज माफ करून नवे कर्ज द्या; बीडमध्ये मनसेचा मोर्चा - MNS agitates in beed

राज्य सरकारने महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ करून महिलांना नव्याने कर्ज द्यावे, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

beed MNS news
बचत गटांचे जुने कर्ज माफ करून नवे कर्ज द्या; बीडमध्ये मनसेचा मोर्चा
author img

By

Published : Dec 7, 2020, 4:23 PM IST

बीड - कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक बचत गट आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने महिला बचत गटांचे संपूर्ण कर्ज माफ करून महिलांना नव्याने कर्ज द्यावे, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बीड जिल्ह्यातील मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बचत गटांचे जुने कर्ज माफ करून नवे कर्ज द्या; बीडमध्ये मनसेचा मोर्चा

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. बीड जिल्ह्यातील वीज ग्राहकांची वीज बिल माफ करावे, अशी मागणी यावेळी झाली. हातावर पोट असलेल्या नागरिकांना दोन वेळ जेवणाची पंचायत आहे. अशा परिस्थितीत वीज बिल भरायचे कसे? असा प्रश्न अनेक कुटुंबांच्या समोर आहे. त्यामुळे वीजबिलात सवलत देण्याची मागणी त्यांनी केली.

दूध उत्पादक शेतकरी संकटात

मागील अनेक वर्षांपासून व्यवसायाला घरघर लागली आहे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला चांगला भाव देण्याची मागणी जोर धरत आहे. दुग्ध व्यवसाय संकटात येण्यासंबंधी परिस्थिती निर्माणी झाली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी मागणी करून देखील सरकार राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे मनसेने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.