ETV Bharat / state

बीड लोकसभा : सुरेश धस ठरले 'गेम चेंजर', धनंजय मुंडेंसाठी धोक्याची घंटा - suresh dhas

बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व पंकजा मुंडे करणार, की धनंजय मुंडे, असा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चिला गेला. मात्र आता बीड लोकसभेच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सुरेश धस ठरले 'गेम चेंजर'
author img

By

Published : May 24, 2019, 12:29 PM IST

बीड - लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांचे मनसुबे उधळले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे यांना ७० हजार मतांची आघाडी देऊन विजयी केले. खऱ्या अर्थाने सुरेश धस हे 'गेम चेंजर' ठरले तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल म्हणजे धोक्याची घंटा ठरत आहे.

सुरेश धस ठरले 'गेम चेंजर'

बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व पंकजा मुंडे करणार, की धनंजय मुंडे, असा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चिला गेला. मात्र आता बीड लोकसभेच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता धनंजय मुंडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. डॉ. प्रीतम मुंडे या १ लाख ६८ हजार ८८८ मतांनी विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बीड जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांची पुढची वाटचाल निश्चित होणार होती. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंडे बहीण-भावांच्या नेतृत्वाचा विषय प्रतिष्ठेचा बनला होता. बीड जिल्ह्याचे नेतृत्व पालक मंत्री पंकजा मुंडे करणार की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे करणार, असा मुद्दा प्रचारात मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी दाखवून दिले, की बीड जिल्ह्यातील जनता अजूनही माझ्याबरोबरच आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळालेली आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपला १८ हजार मतांची आघाडी आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना 'हुकमी एक्का' असे संबोधले आहे. एकीकडे सुरेश धस यांनी आपला आष्टी विधानसभा मतदार संघावरील 'होल्ड' राष्ट्रवादीला दाखवून दिला आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र बीड लोकसभेचा निकाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. कारण काहीच दिवसांवर विधान सभेच्या निवडणुका आल्या आहेत.

विशेष म्हणजे शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना कडवा विरोध केला होता. विनायक मेटे यांच्या विरोधाचा भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. उलट २०१४ मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा अधिक मते घेऊन डॉ. प्रीतम मुंडे विजयी झाल्या. एकंदरीत या निकालानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना विनायक मेटे यांचा पंकजा मुंडे यांना केलेला विरोध आवडला नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

Intro:बीड लोकसभा मतदार संघाच्या निकालानंतर विश्लेषण पाठवत आहे

**********************
बीड लोकसभा; आ. सुरेश धस ठरले 'गेम चेंजर' तर धनंजय मुंडे यांच्यासाठी धोक्याची घंटा

बीड- लोकसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांचे मनसुबे उधळले आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतर राजकीय समीकरन बदलले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघातून डॉ. प्रीतम मुंडे यांना 70 हजार मतांची आघाडी देऊन विजयी केले. खऱ्या अर्थाने आ. सुरेश धस हे 'गेम चेंजर' ठरले तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल म्हणजे धोक्याची घंटा ठरत आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व पंकजा मुंडे करणार की, धनंजय मुंडे करणार. असा मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चर्चिला गेला मात्र आता बीड लोकसभेच्या निकालानंतर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता धनंजय मुंडे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

Body:बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून डॉक्टर प्रीतम मुंडे राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. डॉ. प्रीतम मुंडे या 1 लाख 68 हजार 888 मतांनी विजयी झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बीड जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांची पुढची वाटचाल निश्चित होणार होती. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंडे बहीण-भावांच्या नेतृत्वाचा विषय प्रतिष्ठेचा बनला होता. बीड जिल्ह्याचे नेतृत्व पालक मंत्री पंकजा मुंडे करणार की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे करणार असा मुद्दा प्रचारात मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला. बीड मधुन प्रीतम मुंडे यांच्या विजयानंतर पंकजा मुंडे यांनी दाखवून दिले की, बीड जिल्ह्यातील जनता अजूनही माझ्याबरोबरच आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील सहा ही विधानसभा मतदारसंघातून भाजपला आघाडी मिळालेली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपला 18 हजार मतांची आघाडी आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या विजयांमध्ये आष्टीचे आ. सुरेश धस हे 'गेम चेंजर' ठरले आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना 'हुकमी एक्का' असे संबोधले आहे. एकीकडे सुरेश धस यांनी आपला आष्टी विधानसभा मतदार संघा वरील 'होल्ड' राष्ट्रवादी ला दाखवून दिला आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र बीड लोकसभेचा निकाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. कारण काहीच दिवसावर विधान सभेच्या निवडणुका आल्या आहेत.
विशेष म्हणजे शिवसंग्राम चे प्रमुख विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना कडवा विरोध केला होता. विनायक मेटे यांच्या विरोधाचा भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यावर काडीचाही परिणाम झाला नाही. उलट 2014 मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा अधिक मते घेऊन डॉ. प्रीतम मुंडे विजयी झाल्या. एकंदरीत या निकालाला नंतर शिवसंग्राम च्या कार्यकर्त्यांना विनायक मेटे यांचा पंकजा मुंडे यांना केलेला विरोध आवडला नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

Conclusion:बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर प्रीतम मुंडे यांना आघाडी आहे. यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून पाच हजार 823 मतांचे भाजपला मताधिक्य आहे. केज विधानसभा मतदारसंघात 20 हजार 936 माजलगाव 16 हजार 907, परळी 18 हजार 980 , आष्टी 70 हजार 313 तर गेवराई 34 हजार 465 मतांची भाजपच्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जनतेने डावलले असल्याचे चित्र बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.