बीड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना अपात्र करण्याच्या सहकार मंत्र्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. यामुळे आदित्य सारडा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी कर्ज माफी योजनेतील प्रोत्साहन अनुदान खातेदारांच्या कर्जखाती वळविल्याप्रकरणी सहकार विभागाच्या विभागीय सहनिबंधकांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना अपात्र ठरवले होते. राज्याच्या सहकार मंत्र्यांनीदेखील ही अपात्रता कायम ठेवली होती. दरम्यान, विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला सहकार मंत्र्यांकडे दाद मागतानाच आदित्य सारडा यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयातही आव्हान दिले होते. त्यावेळी उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती.
सहकार मंत्र्यांच्या निर्णयानंतरही ही स्थगिती कायम असल्याचे आता उच्च न्यायालयाने म्हटले असून आदित्य सारडांसाठी हा मोठा दिला आहे.