ETV Bharat / state

चक्क बदलली न्यायालयातील कागदपत्रे, सात वर्षानंतर वकिलाच्या 'त्या' संशयानं प्रकार उघडकीस - पोलीस निरीक्षक अमोल गुरले

Fake Document for Compensation : बीडच्या गेवराईतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जमिनीचा अधिक मोबदला मिळवण्यासाठी चक्क न्यायालयातील कागदपत्र बदलल्याचं समोर आलंय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Fake Document for Compensation
Fake Document for Compensation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 7:38 AM IST

बीड Fake Document for Compensation : पैशासाठी कोणता माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावांमध्ये घडलाय. भूसंपादनातून अधिकचा मोबदला मिळावा यासाठी न्यायालयाची कागदपत्रे बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या अगोदर त्या शेतकऱ्याला 2016 मध्ये बीडच्या न्यायालयानं निकाल दिला. परंतु, यामधील सहा मुख्य पानं बदलण्यात आली. हा प्रकार 2016 ते 2022 या कालावधीत घडला. यामधील सहाय्यक सरकारी वकील यांना ही माहिती समजताच त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर न्यायालयाच्या वतीनं कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चक्क न्यायालयाची कागदपत्रे बदलत आल्यानं न्यायालयात एकच खळबळ उडालीय.

नेमकं प्रकरण काय : बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावाच्या शिवारात पाझर तलावाच्या संपादित जमिनीच्या तक्रारदाराला भूसंपादन अधिकाऱ्यानं निधी मंजूर केला होता. नुकसान भरपाईच्या पोटी त्यांना काही रक्कमदेखील मिळाली. मात्र त्यामध्ये शेतकऱ्याची नाराजी असल्यानं यासाठी त्यांनी पाच प्रकरणे दाखल केली होती. त्यानुसार 2 जुलै 2016 रोजी तत्कालीन सह दिवाणी न्यायमूर्ती व सरन्यायाधीश साजिद आरिफ सय्यद यांनी हे प्रकरण निकाली काढले होते. त्यानंतर न्यायालयाच्या कागदपत्रात नेमका फेरबदल हा कोणी केला असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.

कसा झाला उलगडा : न्यायालयाच्या निकालाचा प्रतीचा कागद हा जाड असतो. यात वाढीव मावेजाची रक्कम लिहिण्यात आली होती. सहाय्यक सरकारी वकिलांनी व या प्रकरणातील प्रमाणित केलेल्या प्रतींची मागणी करण्यात आली. यात पान क्रमांक 9, 10, 17, 19, 20 आणि 25 ही पानं बदलल्याचं निदर्शनास आलं. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे अधीक्षक नरेंद्र पाठक यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झालाय. भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम कलम 34, 420, 465, 467, 468, 471 नुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच याचा तपास पोलीस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.

जो गुन्हा दाखल झालेला आहे, यात नेमके कोणते कर्मचारी त्या कालावधीमध्ये कार्यरत होते हे तपासण्यात येत आहे. त्याचबरोबर हा प्रकार करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर या कालावधीत जे कोणी अधिकारी कर्मचारी व संबंधित शेतकरी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात येईल. - पोलीस निरीक्षक अमोल गुरले

हेही वाचा :

  1. मुंबई हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायाधीशांना लिंक पाठवून सायबर चोरट्याने घातला गंडा
  2. राजस्थानच्या व्यवसायिकाला शेअर मार्केट सल्लागार असल्याचं सांगून १ कोटीला घातला गंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.