बीड- पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील परळी तालुक्यातील एक व्यक्ती वगळता सर्वांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या कोरोना तपासणी लॅबच्या उद्घाटनाप्रसंगी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी सोशल डिस्टन्स ठेवून संपर्क आला होता. या सगळ्या बाबी लक्षात घेता खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी काही दिवस निवासस्थानी राहूनच कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मात्र, पालकमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपापल्या स्तरावर विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी इतरांच्या व कुटुंबाच्या काळजीपोटी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रविवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व हर्ष पोद्दार यांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
खबरदारी म्हणून बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक होम क्वारंटाइन
धनंजय मुंडेंच्या संपर्कात आल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे.