ETV Bharat / state

परळीत एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न, पोलिसांना पाहाताच ठोकली धूम - HDFC Bank

परळी शहरातील जलालपूर रस्त्यावर एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न शनिवारी (ता.१) मध्यरात्री चोरट्यांनी केला. गस्तीवर असलेल्या संभाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी मशीन जाग्यावर सोडून धुम ठोकली.

Attempt to steal HDFC Bank ATM machine on Jalalpur Road
जलालपूर रोडवरील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न
author img

By

Published : May 2, 2021, 1:03 PM IST

परळी वैजनाथ - शहरातील जलालपूर रस्त्यावर एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न शनिवारी (ता.१) मध्यरात्री चोरट्यांनी केला. रात्री गस्तीवर असलेल्या संभाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी मशीन जाग्यावर सोडून धूम ठोकली.

परळीतील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न

शहरात विविध बँकेच्या एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकच नाहीत. या एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी जलालपूर रस्त्यावर असलेल्या एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन शनिवारी मध्यरात्री फोडले. पैसे असलेले मशीन उचलून घेऊन जात असताना संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार दिसला. पोलिसांची गाडी पाहताच चोरट्यांनी मशीन जाग्यावर सोडून धुम ठोकली. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग केला पण अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करुन हे मशीन ताब्यात घेतले आहे. दरम्यान शहरात असलेल्या १४ ते १५ एटीएम मशीनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या एटीएम मशीनची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची आवश्यकता असताना बँकेने एटीएम मशीनची सुरक्षा कोणाच्या भरवश्यावर ठेवली आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.