ETV Bharat / state

नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मारहाण - नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्र न्यूज

नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री काही स्थानिक नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांसह एका नर्सला मारहाण झाली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. तरकसे यांनी या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Medical Staff
आरोग्य कर्मचारी
author img

By

Published : Sep 2, 2020, 12:45 PM IST

बीड - नाळवंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री उशिरा आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. तरकसे यांनी या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री काही स्थानिक नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांसह एका नर्सला मारहाण झाली. याशिवाय कार्यलयातील काही कागदपत्रेही फाडण्यात आली आहेत. या हल्ल्यात आरोग्य केंद्रातील 2 कर्मचारी जखमी झाले. कोरोनाचे संकट असताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. तरकसे यांनी संताप व्यक्त केला जात आहे. हल्ला केलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.

नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मारहाण

अद्याप या घटनेबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. जिल्हा आरोग्य विभाग या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकिसन पवार यांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.