ETV Bharat / state

Sunil Tatkare : अजित पवार राष्ट्रीय नेते अन् शरद पवार कोण? सुनील तटकरे यांच्याकडे नाही उत्तर

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आगामी निवडणुका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ चिन्हावर लढणार, त्यासाठी निवडणूक आयोग मार्ग मोकळा करेल असा विश्वास असल्याचं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं. (Sunil Tatkare on Ajit Pawar) (Sunil Tatkare on Sharad Pawar)

Sunil Tatkare
सुनील तटकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 10:29 PM IST

माहिती देताना सुनील तटकरे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार आमचे राष्ट्रीय नेते असल्याचं निवडणूक आयोगाला कळवलं, असे तटकरे म्हणाले. तर अजित पवार राष्ट्रीय नेते तर शरद पवार कोण? असा प्रश्न तटकरे यांना विचारला होता. याबाबत मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं. त्यामुळे पक्ष फुटला नसल्याचं सांगणाऱ्या राष्ट्रवादीत नेमकं काय खरं याबाबत संभ्रम कायम आहे. (Sunil Tatkare on Ajit Pawar) (Sunil Tatkare on Sharad Pawar)

फोटो वापरणार नाही : सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करुन आम्ही सत्तेत सामील झालो, राष्ट्रीय निवडणूक आयोग आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करेल अशी आम्हाला आशा आहे. आगामी निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्यास मार्ग लवकरच मोकळा होईल. शरद पवार यांचा फोटो लावण्याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांचा फोटो वापरणार नाही. त्यांची सूचना मान्य केली, असे सुनील तटकरे म्हणाले.

महाविकास आघाडीत अलबेल : विचारधारेवर विश्वास ठेवत आम्ही सत्तेत सामील झालो. नरेंद्र मोदी, फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेत असून, पक्षाची पुढे वाटचाल सुरू आहे. पक्ष वाढीसाठी वेगवेगळ्या भागांमध्ये जात आहोत, त्याचाच एक भाग म्हणून बीडमध्ये जाहीर सभा घेत आहोत. यापुढेही राज्यात वेगवेगळ्या सभा घेणार आहोत. हे करत असताना आम्ही सरकारमध्ये आहोत याचे भान ठेवलं जाईल, असं सुनील तटकरे म्हणाले. तसेच अजित पवार यांच्यासोबत काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच शरद पवार यांच्याकडे बोट दाखवणार नाही. महाविकास आघाडीमधील पक्ष आमच्यावर तिखट शब्दात टीका करतात. त्यामुळे त्यांच्यात किती अलबेल आहे हे लक्षात येत असल्याची टीका सुनील तटकरे यांनी केली.

महायुतीच्या जागा जिंकून आणण्यासाठी प्रयत्न : अजित पवार यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांवर परिणाम होणार नाही. आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत. आता तरी अजित पवारांना मुख्यमंत्री करा अशी भूमिका अद्याप आमची नाही. बीडला रविवारी सभा होणार आहे. ती जागा लोकसभेसाठी आहे म्हणून तिथे सभा होत आहे असे बोलणे चुकीचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असून, नंतरच निर्णय होईल. पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, जास्त जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न महायुतीचा राहील, असे सुनील तटकरे यांनी सांगितलं.

सर्व पक्षांची अपरिहार्यता : सध्या होणारे विधानं महाविकास आघाडीत किती फूट आहे हे दाखवत आहेत. एक विचारधारा घेऊन काम करतो, त्यावेळी सोबतच्या पक्षांच्या भूमिका मान्य असावी असे नाही. किमान समान कार्यक्रम तयार करून आम्ही पुढे जात आहोत. भुजबळ यांच्या कार्यक्रमामधील भाषण पूर्ण पाहा म्हणजे त्याचा अर्थ कळेल. २०१९ मध्ये शिवसेनेसोबत जाण्याची काँग्रेसची अपरिहार्यता नव्हती का? असा प्रश्न तटकरे यांनी विचारला.

हेही वाचा -

  1. Sunil Tatkare On Sharad Pawar : शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य - सुनील तटकरे
  2. Sunil Tatkare : आधी शिवसेनेसोबत, आता भाजपासोबत गेलो तर काय बिघडलं - सुनील तटकरे
  3. Ajit Pawar News : पक्ष मजबूत करण्यासाठी अजित पवार गटाचा 'धडाका' ; पक्षातील मंत्र्यांवर आहे 'या' जिल्ह्यांची जबाबदारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.