बीड - ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे पेरले मात्र उगवलेच नाही. अशा शेतकऱ्यांच्या संदर्भाने शासन योग्य तो निर्णय तात्काळ घेईल. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मी होऊ देणार नाही, असे आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत दिली आहे.
कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी बातचित करताना प्रतिनिधी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे सोमवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, सध्या खरीपाच्या पेरणी लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत बळीराजा पिचला जाऊ नये, यासाठी मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलो आहे. औरंगाबाद मध्ये 'नायक स्टाईल' केलेल्या कारवाई संदर्भातही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की यावर्षी सोयाबीन बियाणे अनेक शेतकर्यांनी पेरले. पण, ते उगवलेच नाही अशा तक्रारी आहेत. यासंदर्भात चौकशीचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पेरले, मात्र उगवलेच नाही अशा शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही, असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.
रिक्त पदेही भरणारबीड जिल्ह्यातील कृषी विभागात वर्ग 2 व 3 ची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे भरण्याच्या संदर्भाने देखील आम्ही सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे, मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागासमोर आव्हान