ETV Bharat / state

Beed Agriculture Festival: कृषी महोत्सवात लावण्या, हिंदी गाण्यांवर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा धिंगाणा; अधिकाऱ्यांचा डान्स व्हायरल

author img

By

Published : Feb 27, 2023, 8:55 PM IST

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गेली दोन दिवस हा कृषी महोत्सव बीड शहरामध्ये छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण या ठिकाणी चालू आहे आणि याच कार्यक्रमादरम्यान रात्री आर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी यांनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि चक्क बाटलीच डोक्यावर घेत अधिकाऱ्यांनी डान्स केला. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ माजली.

Beed Agriculture Festival
अधिकाऱ्यांचा डान्स
कृषी महोत्सवातील 'त्या' डान्सवर टीका

बीड: आयोजक असलेले सुभाष साळवे यांना तर चक्क खांद्यावर घेत डान्स केल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. मग कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे की अधिकाऱ्यांना डान्स करण्यासाठी असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले होते. कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी असा प्रकार केल्याने यांच्यावर कार्यवाही होते का, हे सुद्धा पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांचा संताप: बीड शहरांमध्ये कृषी महोत्सव सध्या साजरा होत आहे. या ठिकाणी आर्केस्ट्रा आयोजित केलेला होता आणि त्याच आर्केस्ट्रामध्ये या अधिकाऱ्यांनी डान्स केले आहेत ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हेच अधिकारी शेतकऱ्यांचे मार्गदर्शक आहेत. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना माहिती करून देणे, शेतकऱ्यांची प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे हे या अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र कर्तव्य सोडून त्यांनी एखाद्या लावणीच्या फडामध्ये डान्स केल्यासारखा या ठिकाणी डान्स केलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले आहे. याच बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपूर्वी पोखरा योजनेचे पैसे मिळत नाहीत म्हणून एका व्यक्तीने आपले जीवन संपवले आहे. एकीकडे हे अधिकारी मात्र लावणीवर डान्स करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशीच मागणी शेतकरी मोहन गुंड यांनी केली आहे.

हाच का कृषी महोत्सव? राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या कृषी महोत्सवात स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावाने आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या, हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान "अभी जिंदा हु तो जी लेने दो" या गाण्यावर गेवराईच्या तालुका कृषी अधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी डोक्यावर बॉटल घेऊन डान्स केला. तर "चंद्रा" या लावणीवर आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी चक्क तोंडात फुल घेऊन कार्यक्रमाच्या नावावर धिंगाणा घातला. खरे पाहिले तर यांचा हा धिंगाणा पाहून, नेमकं हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आहे की, अधिकाऱ्यांना आपली नाचण्याची हौस भागवत धिंगाणा घालण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री कारवाई करतील का? विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, याचे देखील भान त्यांना राहिले नाही. हा व्हिडिओ पाहून आपल्याला देखील शेतकऱ्यांच्या नावावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवात नेमकं काय चाललंय ? असा प्रश्न पडला असेल. 'दिलबर मेरे कबतक मुझे ऐसेही तडपाओंगे' या गाण्यावर तालुका कृषी अधिकारी नाचत आहेत. तर 'झिंग....झिंग....झिंगाट....' या गाण्यावर प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह सर्वच तालुका कृषी अधिकारी इतर कर्मचारी नाचत आहेत. शासनाकडून कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी आयोजित केला जातो. या कृषी महोत्सवांमधून शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा आणि शेती उपयोगी सर्वच माहिती मिळावी, ही अपेक्षा असते. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून या कृषी महोत्सवाचे आयोजन केले. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी धिंगाणा घातला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा: Opposition Objected On Governor Speech: मराठी भाषा दिनी राज्यपालांनी किमान मराठीत भाषण करायला हवे होते, विरोधकांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.