ETV Bharat / state

बीड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई - बीड शहर बातमी

उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी शहरातील जलालपूर रस्ता व तोतला मैदानावर असलेल्या गौण खनिजाच्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई करत ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर 6 लाख 94 हजार 740 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.

administration take action against Sand Mafia in Beed district
जप्त केलेले मुद्देमाल
author img

By

Published : Mar 16, 2021, 9:52 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - येथील उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे व तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी शहरातील जलालपूर रस्ता व तोतला मैदानावर असलेल्या गौण खनिजाच्या पाच ट्रॅक्टरवर कारवाई करत ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर 6 लाख 94 हजार 740 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.

शहरातील तोतला मैदानावर गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी सोमवारी (ता.15) कारवाई करत पाच ट्रॅक्टरवर कारवाई केली. यामध्ये (एम एच 15 ए 9501), (एम एच 23 5818), (एम एच 22 एच 5052), (एम एच 23 2400), (एम एच 44 सी 2877) तोतला मैदान व जलालपूर रस्त्यावर अवैध वाहतूक करताना ताब्यात घेतले. या वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48-7 नुसार म्हणजे वाळू बाजार भावाच्या पाचपट दंड एकूण 6 लाख 94 हजार 740 रुपये दंड लावण्यात आला आहे. यामुळे गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. पण, राखेची व वाळूची वाहतूक करणाऱ्या मोटारीवर (ट्रक) कधी कारवाई करणार, अशी चर्चा सामान्य नागरीकांमध्ये आहे.

हेही वाचा - बनावट लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराच्या आवळल्या मुसक्या

हेही वाचा - आमदार बाळासाहेब आजबे यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.