ETV Bharat / state

कामातील निष्काळजीपणा नडला, बीडमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यासह २ तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे - अविनाश शिंगटे

महसूल विभागात मागील काही महिन्यांमध्ये चुकीच्या बाबी घडल्याचे समोर आले आहे. याला आळा घालण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १ उपजिल्हाधिकारी आणि २ तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
author img

By

Published : Jun 19, 2019, 5:27 AM IST

बीड - जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी १ उपजिल्हाधिकारी आणि २ तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे. जिल्ह्यातील चारा छावण्या, वाळू आणि टँकर या कामांमध्ये अनागोंदी कारभार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड

महसूल विभागात मागील काही महिन्यांमध्ये चुकीच्या बाबी घडल्याचे समोर आले आहे. याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. निलंबन प्रस्ताव पाठवलेल्यामध्ये उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे आणि पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांचा समावेश आहे. मुळे आणि शिंगटे यांच्यावर चारा छावण्या, वाळू आणि पुरवठा विभागातील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आहे. तर चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याशिवाय तहसीलदार शिंगटे यांच्यावर बीड तहसीलमधील पुरवठा विभागात सुरू असलेल्या अनागोंदीला लगाम लावण्यात कसूर केल्याचा ठपका आहे. त्यांनी बीडच्या गोदाम व्यवस्थापकावर वेळेत कारवाई केली नाही, धान्याच्या वितरणाकडे लक्ष दिले नाही, असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता. त्याचाही उल्लेख या निलंबन प्रस्तावात करण्यात आला आहे.

मुळे यांच्यावर वाळू, छावण्यासह निवडणूक कामात केलेले दुर्लक्ष आणि कार्यालयीन कामातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. सतत वादात असलेल्या पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष, अधिकारांचा गैरवापर करून बदल्या करणे, कर्मचाऱ्यांशी अरेरावी, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांवर आता विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Intro:बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा निर्णय; एक उपजिल्हाधिकारी आणि दोन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे

बीड- जिल्ह्यातील महसूल विभागात मागील काही महिन्यांमध्ये चुकीच्या बाबी घडल्याचे समोर आले याला आळा घालण्यासाठी म्हणून बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी एक उपजिल्हाधिकारी व दोन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे जिल्ह्यातील चारा छावण्या, वाळू व टॅंकर आदी कामांमध्ये अनागोंदी कारभार होत असल्यावरून ही कारवाई केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

निलंबन प्रस्ताव पाठवलेल्या उपजिल्हाधिकारी यामध्ये प्रभोदय मुळे यांच्यासह बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे आणि पाटोद्याच्या  तहसीलदार रूप चित्रक यांचा निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. प्रभोदय मुळे आणि अविनाश शिंगटे यांच्यावर चारा छावण्या , वाळू आणि पुरवठा विभागातील गैरप्रकरांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आहे. तर रूपा  चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजात दुर्लक्षाचा ठपका ठेवण्यात आला आहे. 
बीड जिल्हा प्रशासनात मागच्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणावर अनागोंदी माजल्याचे चित्र आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दुष्काळी परिस्थितीही अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे समोर आले असून याचा ठपका बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासोबतच अवैध वाळू वाहतूक, उपसा याकडे दुर्लक्ष करण्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. 
याशिवाय तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्यावर बीड तहसीलमधील पुरवठा विभागात सुरु असलेल्या अनागोंदीला लगाम लावण्यात कसूर केल्याचा ठपका आहे. बीडच्या गोदाम व्यवस्थापकावर वेळेत कारवाई केली नाही, धान्याच्या वितरणाकडे लक्ष दिले नाही असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता त्याचाही उल्लेख या निलंबन प्रस्तावात करण्यात आला आहे. 
प्रभोदय मुळे  यांच्यावर वाळू , छावण्या यासह निवडणूक कामात केलेले दुर्लक्ष आणि कार्यालयीन कामातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. 
सतत वादात असलेल्या पाटोद्याच्या तहसीलदार रूपा  चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष, अधिकारांचा गैरवापर करून बदल्या करणे, कर्मचाऱ्यांशी अरेरावी असे आरोप ठेवण्यात आले असून त्यांच्याही निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांवर आता कर्तव्यकठोर म्हणून ओळखले जाणारे विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजर आहेत. Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.