ETV Bharat / state

राज्यात दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर; बीडमधील अंबाजोगाईचा समावेश - retreating rain beed

परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत राज्यात 2 तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा समावेश असून उस्मानाबाद तालुक्यात परांडा येथे मध्यम दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

दुष्काळ
author img

By

Published : Nov 1, 2019, 11:49 AM IST

बीड - राज्यात 2 तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा समावेश आहे. याशिवाय उस्मानाबाद तालुक्यात परांडा येथे मध्यम दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना सवलती मिळणार आहेत. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाने हुलकावनी दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. दुष्काळ जाहीर करावा म्हणून राष्ट्रवादीचे परळी विधानसभाध्यक्ष तथा अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे उपसभापती गोविंद देशमुख यांनी सतत निवेदने देत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शेवटी राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.

हेही वाचा - 'मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करा'

'दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन करून २०१९ नुसार राज्यातील ३ तालुक्याच्या परिस्थितीबाबत विचार करण्यात आला. त्यानुसार जून ते जुलै महिन्यातील पर्जण्याची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषय निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिक परिस्थिती या सर्व घटकाचा एकत्रीत विचार करून वरील घटकांनी प्रभावीत झालेल्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना मिळणार या सुविधा -
दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या २ तालुक्यात शेती पंपाची विज जोडणी खंडीत न करणे, जमीन महसुलात सुट, पिक कर्जाचे पुर्नगठन, शेती निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी वीज पंप बिलात साडेतेहतीस टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी परिक्षा शुल्कात माफी, रोहयोच्या कामात निकषात शिथीलता, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स सुरू करणे आदी उपाय योजना अंमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

हेही वाचा - पोटदुखीच्या त्रासाने धनंजय मुंडे रुग्णालयात दाखल

Intro:
खालील बातमी प्रतीकात्मक फोटो घ्यावा ही विनंती
*****
राज्यात दोन तालुक्यात दुष्काळ जाहीर; बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई चा समावेश

बीड- राज्यात दोन तालुक्यांमध्ये दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई चा समावेश आहे. याशिवाय उस्मानाबाद तालुक्यात परांडा येथे मध्यम दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परतीच्या पावसाने राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना सवलती मिळणार आहेत.

राज्यात जून ते ऑगष्ट दरम्यान पावसाने हुलकावनी दिल्याने गंभीर परिस्थिती बनली होती . दुष्काळ जाहीर करावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभाध्यक्ष तथा अंबाजोगाई कृ ऊ बा उपसभापती गोविंद देशमुख यांनी सतत निवेदने देत पाठ पुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शेवटी राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला .
शासन निर्णय क्रं एस वी वाय २०१९ / प्र क्र २२०/ म ७ दि ३१ आक्टोंबर २०१९ या प्रपत्रकानुसार दुष्काळ व्यवस्थापन संहीता २०१६ नुसार जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीचे मुल्यांकन खरीप २०१९ नुसार राज्यातील तिन तालुक्यातील जून ते जुलै महीण्यातील पर्जण्याची तूट,उपलब्ध भूजलाची कमतरता,दूरसंवेदन विषय निकष,वनस्पती निर्देशांक,मृद आर्द्रता,पेरणी खालील क्षेत्र व पिक परिस्थिती या सर्व घटकाचा एकत्रीत विचार करून वरील घटकांनी प्रभावीत झालेल्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे .

शेतकऱ्यांना या मिळणार सुविधा-

दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या दोन तालुक्यात शेती पंपाची विज जोडणी खंडीत न करणे, जमिन महसुलात सुट, पिक कर्जाचे पुर्नगठन,शेती निगडीत कर्ज वसुलीस स्थगीती,कृषी विज पंप बिलात साडेतेहतीस टक्के सुट,शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी परिक्षा शुल्कात माफी,रोहयोच्या कामात निकषात शिथीलता,पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकर्स सुरू करणे आदी उपाय योजना अमलात आणण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.