ETV Bharat / state

आदित्य सारडांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवले

मागील 18 महिन्यांपासून हे प्रकरण सहनिबंधक लातूर यांच्याकडे सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांच्या तक्रारीवरून विभागीय उपनिबंधक लातूर यांनी हा निर्णय दिला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना आदित्य सारडा म्हणाले, या प्रकरणात मी सहनिबंधक लातूर यांना खुलासा केलेला आहे. मात्र, माझा खुलासा विचारात न घेताच त्यांनी निर्णय दिला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे.

District co operative bank beed
जिल्हा बँक बीड
author img

By

Published : Dec 21, 2019, 5:31 PM IST

बीड - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक लातूर यांनी हा निर्णय घेतला. शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप न करता ठेवीदारांना वाटप केला असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. तसेच बँकेचे मुख्याधिकारी विकास देशमुख यांनाही बडतर्फ करण्यात आले. आदित्य सारडा हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. याप्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊन सहकार मंत्री यांच्याकडे अपील करणार असल्याचे आदित्य सारडा म्हणाले.

आदित्य सारडा (माजी जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँक बीड)

मागील 18 महिन्यांपासून हे प्रकरण सहनिबंधक लातूर यांच्याकडे सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांच्या तक्रारीवरून विभागीय उपनिबंधक लातूर यांनी हा निर्णय दिला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना आदित्य सारडा म्हणाले, या प्रकरणात मी सहनिबंधक लातूर यांना खुलासा केलेला आहे. मात्र, माझा खुलासा विचारात न घेताच त्यांनी निर्णय दिला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. या प्रकरणात आम्ही सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करणार आहोत. कारण जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांना कर्ज न देता अगोदर सोसायटीला देते आणि सोसायटी स्वतः एक स्वायत्त संस्था आहे. असे असतानाही चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - कांदे भाववाढीनंतर महागणार फोडणीचाही 'तडका'

या प्रकरणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांना अगोदर कुठलीच कारणे दाखवा नोटीस दिली नाही आणि त्यांना थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहोत. मात्र, जाणीवपूर्वक तशा पद्धतीने प्रसिद्धी करून जिल्हा बँकेची आणि आमची बदनामी करत असल्याचा प्रकार देखील समोर येत असल्याचे सारडा म्हणाले.

हेही वाचा - अजित पवारांवर बोलण्याचा देवेंद्र फडणवीसांना नैतिक अधिकार नाही - जयंत पाटी

Intro:आदित्य सारडा यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून हटवले; सहनिबंधक, लातूर यांचा निर्णय

बीड- येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना वाटप न करता ठेवीदारांना वाटप केला असल्याचा आरोप करत जिल्हा बँकेचे जिल्हाध्यक्ष आदित्य सारडा यांना शनिवारी अध्यक्ष पदावरुन हटवले तर बँकेचे मुख्याधिकारी विकास देशमुख यांना बडतर्फ केले. हा निर्णय विभागीय सहनिबंधक लातूर यांनी दिला आहे. आदित्य सारडा हे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. याप्रकरणात कायदेशीर सल्ला घेऊन सहकार मंत्री यांच्याकडे अपील करणार असल्याचे आदित्य सारडा म्हणाले.

Body:मागील 18 महिन्यांपासून हे प्रकरण सहनिबंधक लातूर यांच्याकडे सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांच्या तक्रारीवरून विभागीय उपनिबंधक लातूर यांनी हा निर्णय दिला आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना आदित्य सारडा म्हणाले की, या प्रकरणात मी सहनिबंधक लातूर यांना खुलासा केलेला आहे. मात्र माझा खुलासा विचारात न घेताच त्यांनी निर्णय दिला आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. या प्रकरणात आम्ही सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करणार आहोत कारण जिल्हा बँक थेट शेतकऱ्यांना कर्ज न देता अगोदर सोसायटीला देते व सोसायटी स्वतः एक स्वायत्त संस्था आहे. असे असतानाही चुकीच्या पद्धतीने आमच्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Conclusion:या प्रकरणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांना अगोदर कुठलीच कारणे दाखवा नोटीस न देता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहोत नाहीत. मात्र जाणीवपूर्वक तशा पद्धतीने प्रपोगंडा करून जिल्हा बँकेची व आमची बदनामी करत असल्याचा प्रकार देखील समोर येत असल्याचे सारडा म्हणाले.
******

बातमीसोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांचा बाईट व जिल्हा बँकेचे विजवल अपलोड करत आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.