ETV Bharat / state

कौटुंबिक वादातून भावाच्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, एक गंभीर

माजलगावमधील कालिका नगर येथे शनिवारी एकाने भावजईसह तीच्या दोन भावांवर आणि लहान मुलांवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भाऊ बनला वैरी : घरगुती वादातून भावाच्या कुटुंबावर केला अ‍ॅसिड हल्ला
author img

By

Published : May 4, 2019, 9:35 PM IST

बीड - माजलगावमधील कालिका नगर येथे शनिवारी एकाने भावजईसह तीच्या दोन भावांवर आणि लहान मुलांवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १ जण गंभीर, तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा हल्ला घरगुती वादातून झाल्याचे समते. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुल्लक भांडणातही अॅसिडचा वापर होत असल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. माजलगाव शहरातील कालिका नगर येथे राहणाऱ्या अहमद जैनुद्दीन जर्गर, नजीब जर्गर व इर्शाद जर्गर या तीन भावांचा जागेवरून वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी इर्शादचे मेहुणे गेले होते. अहमद आणि नजीब यांनी यावेळी समीर यांच्यासह इर्शादच्या कुटुंबीयांवर चक्क अॅसिड हल्ला केला. यात पाच जण जखमी झाले आहेत.

या हल्यात समीर शेख मेहबूब शेख (वय ३५ वर्षे) शेख मकसूद (वय ३८ वर्षे), दिना इर्शाद जर्गर (वय ८ वर्षे) व अलशफात इर्शाद जर्गर (वय १५ वर्षे) यासह रेश्मा ईर्शाद जर्गर (वय ३३ वर्षे) यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात माजलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराबाहेर काढण्यासाठी भावाच्या कुटूंबावर अ‍ॅसिड हल्ला
माजलगाव शहरातील कालिका नगर मधील घटना

बीड - हे घर  आम्ही विक्री काढले आहे तू घराबाहेर निघ असे म्हणत भावजईसह तीच्या दोन भाऊ व लहान मुलांवर अ‍ॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना शनिवारी माजलगाव शहरातील कालिका नगर येथे घडली. सदरील हल्ला घरगुती भांडणाच्या कारणावरून झाला असून आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलिसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालिका नगर येथील रहिवासी अहमद जैनुद्दीन जर्गर व नजीब जैनुद्दीन जर्गर यांच्या घरी इर्शाद जर्गर यान्ना माजलगाव शहरातील बाजार रोड येथील शेख महेबुब यांची मुलगी दिली होती. या उभयतांना आठ वर्षीय व पंधरा वर्षीय अशी दोन मुले असून कुटुंब कालिका नगर येथे एकत्रित कुटुंबात स्वतःच्या घरात राहते. परंतु या घरावर कब्जा करून लहान भाऊ इर्शाद जर्गर यांना घराबाहेर काढण्यासाठी शुक्रवारी रात्री 11.30 वा. दरम्याण अहमद जर्गर व नजीब जर्गर यांनी वाद घालून भांडण करण्यास सुरुवात केली. घराबाहेर हे घर आम्हाला विकायचे आहे, असे म्हणून घरातील वाद सोडवण्यासाठी गेलेली महिलेचे भाऊ समीर शेख मेहबूब शेख, शेख मकसूद, दिना इर्शाद जर्गर, व अलशफात इर्शाद जर्गर यासह रेश्मा ईर्शाद जर्गर यांच्यावर  अ‍ॅसिड हल्ला केला. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.