बीड : शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील घटना ताजी असतानाच (Beed crime) परळी तालुक्यातील शिरसाळा पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात अटक (PSI arrested for taking bribe) करण्यात आली. ही कारवाई आज करण्यात आली. यामुळे बीड जिल्ह्यातील पोलिसांची प्रतिमा खालावताना (image of police tarnished) दिसत आहे. एसीबीच्या ट्रॅपमध्ये आतापर्यंत 8 पोलीस कर्मचारी अडकले (ACB team arrested 8 policemen) आहेत. (Latest news from Beed)
पोलिसांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?
बीड पोलिस दलात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढतच आहेत. दोन दिवसापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व अंमलदारास लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यांनतर या दोघांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज सिरसाळा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना पकडला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.8) दुपारी बीड एसीबीच्या टीमने केली आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून 25 हजारांच्या लाचेची मागणी : प्रकाश शेळके असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीड जिल्ह्यातील 4 पोलीस उपनिरीक्षक , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 1,व 3 पोलीस नाईक यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात जानेवारी 2022 ते डिसेंबर पर्यंत या वर्षांमध्ये 6 ट्रॅप 8 जण पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत.
ही आहेत लाचेची प्रकरणे :
3 मार्च रोजी पाटोदा पोलीस स्टेशनचे पीएसआय पठाण अफरोज 40 हजाराची लाच घेताना अटक.
23 मार्च धारूरचे पोलीस नाईक तेजस वाव्हुळे 10 हजाराची लाच घेताना अटक.
29 एप्रिल आंबेजोगाईचे एएसआय प्रमोद सेंगरे, पोलिस नाईक नितीन चौरे 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
11 मे आंबेजोगाईचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल सुर्यवंशी 40 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
5 डिसेंबर बीड शिवाजी नगरचे पीएसआय राजू गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर यांना 15 हजाराची लाच घेताना अटक.
8 डिसेंबर शिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शेळके यांना 10 हजाराची लाच घेताना अटक.