ETV Bharat / state

Suicide Young Girl : दहावीत शिकणाऱ्या तरुणीची आत्महत्या; अभ्यासाच्या ताणतणावातून उचलले टोकाचे पाऊल

दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोठी या गावामध्ये घडली आहे. शुल्लक कारणावरून तीने हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती समोर येत आहे.

Suicide Young Girl
तरुणीची आत्महत्या
author img

By

Published : Jan 17, 2023, 10:27 PM IST

बीड : ही विद्यार्थिनी केजच्या कोठी या गावातील रहिवाशी होती. प्रेरणा किसन डोंगरे असे या तरुणीचे नाव आहे. ती दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दहावीचे काही दिवसांपुर्वीच परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मार्चमध्ये ही परीक्षा होणार आहे. ही विद्यार्थिनी दररोज अभ्यास करत होती. मात्र, आपण केलेला अभ्यास लक्षात राहत नसल्याने ती चिंतेत होती. त्याच चिंतेत तिने आपले जीवन संपवले आहे. आई-वडील झोपलेले असताना घरातीलच लोखंडी खांबाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन तीने आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडिलांनी पोलिसांना माहिती दिली व घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

शुल्लक कारणावरून ताणतणाव : बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून निराशेच्या कारणामुळे तब्बल 550 जणांनी आपले जीवन संपवले आहे. काही शिल्लक कारणे माणसाचे मन बदलून टाकत आहेत. त्यामध्येच माणूस निराशेतून आपले जीवन संपवत आहे. तसेच, यामध्ये हे पाऊल उचलायला माणूस काहीच मागे-पुढे पाहत नाही ही गंभीर गोष्ट आहे. सध्याच्या युगात प्रत्येक व्यक्तीला सुख हवे आहे. मात्र, या सुखाच्या हवेसापोटी माणूस धावपळ करत आपले जीवन जगतो, जीवनात अनेक जण शुल्क कारणावरून अडचणी येतात. शुल्लक कारणावरून ताणतणाव येतो आणि याच कारणामुळे अनेक लोक आपले जीवन संपवत असल्याचे समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.