बीड - जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आंदोलन आणखी चिघळले आहे. सोमवारी मध्यरात्री ऊसतोड कामगारांना घेऊन जाणार ट्रक अडवण्यात आला. जोपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कोणत्याही ऊसतोड कामगाराने कारखान्याला न जाण्याचे आव्हान सीटू ऊसतोड कामगार संघटनेचे मोहन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष प्रा शिवराज बांगर यांनी केले आहे.
ऊसतोड कामगारांना तोडणी दर 400 रुपये मिळावा. मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी तसेच वाहतूक दरात वाढ मिळावी. अशा प्रमुख मागण्या ऊसतोड कामगारांनी केल्या आहेत. तसेच जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोंपर्यंत बीड जिल्ह्यातून एकही ऊसतोड मजूर कामाला जाणार नाही अशी भूमिका सीटू ऊसतोड कामगार संघटनेने घेतली आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव, भाई दत्ता प्रभाळे आदी उपस्थित होते.