ETV Bharat / state

धक्कादायक: शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरच्यांनी बनवला कोरोना पॉझिटिव्हचा बोगस रिपोर्ट

author img

By

Published : May 28, 2021, 8:13 AM IST

सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या विवाहितेने अखेर सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. प्रकरण उघड होऊ नये व शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरकडील मंडळींनी तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवल्याची घटना बीड जिल्ह्याच घडली आहे.

सॅनिटायझर पिऊन आत्महत्या
सॅनिटायझर पिऊन आत्महत्या

बीड - मागील दीड वर्षापासून माहेराहून पैसे आण म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून सतत छळ होत होता. छळाला कंटाळलेल्या विवाहितेने अखेर सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली आहे. विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये व शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरकडील मंडळींनी तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला. मात्र माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा बनाव फसला असून, याप्रकरणात पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कार घेण्यासाठी देत होते त्रास

पूजा गणेश रायकर (वय २१, रा. धनगर जवळका ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या फिर्यादीनुसार पूजाचा विवाह दोन वर्षापूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता. गणेश पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष चांगले गेले. त्यानंतर तुला अजूनही मुलबाळ होत नाही असे पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला हिणवू लागले. कार घेण्यासाठी माहेराहून अडीच लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्यामागे लावला. सहा महिन्यांपूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती बिकट असून आणखी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे, पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ, असे पूजाच्या सासरच्यांना सांगितले.

छळाला कंटाळून प्राशन केले सॅनिटायजर

एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी धनगरजवळका येथे परतला. तिथे आल्यावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाला सतत मारहाण, शिवीगाळ करून तिचा छळ सुरु केला, तिला उपाशी ठेवू लागले. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने बुधवारी (१९ मे) दुपारी तीन वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायजर प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (२५ मे) रात्री आठ वाजता गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला. पुण्यात माझी लॅब असल्याने खासगी रुग्णालयात माझे संबंध आहेत, उपचार चांगले होतील असे म्हणत त्याने पुजाला नेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (२६ मे) पहाटे ४ वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

कोरोना पॉझिटिव्हचा बनवला बोगस रिपोर्ट

दरम्यान, पूजाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघड होईल हे चाणाक्ष नामदेवच्या लक्षात आले. नियमानुसार कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करत नाहीत. त्यामुळे शवविच्छेदन टाळण्यासाठी नामदेवने स्वतःच्या लॅबमध्ये पूजाची कोरोना चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह असल्याचा खोटा लेखी अहवाल रुग्णालयात सादर केला. परंतु, पूजाच्या माहेरच्या लोकांना हा अहवाल मान्य नसल्याने त्यांनी दुसरीकडे पूजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पूजाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चौघांवर गुन्हा; अटकेतील दोघांना न्यायालयीन कोठडी

पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरा शिवाजी, सासू विजुबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे यांच्यावर पाटोदा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे. त्या दोघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर, सासू आणि कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ फरार आहेत. पुढील तपास पीएसआय पठाण करत आहेत.

हेही वाचा - विधवा शिक्षिकेसोबतची मैत्री भोवली, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.