ETV Bharat / state

Lumpy Skin : बीड जिल्ह्यात 7 हजार 523 जनावरांना लंम्पीची लागण - Lumpy Skin

जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 269 गावांतील पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाची बाधा झाली ( Lumpy Skin in Beed district ) आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील तब्बल 7 हजार 523 जनावरांना लंम्पीची लागण झाली असून, जनावरांच्या मृत्यूचे सत्रही सुरू आहे. गत तीन महिन्यांत जिल्ह्यात लम्पी स्किनमुळे तब्बल 306 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 25, 2022, 5:42 PM IST

बीड : जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 269 गावांतील पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाची बाधा झाली ( Lumpy Skin in Beed district) आहे. आतापर्यंत या गावातील तब्बल 7 हजार 523 जनावरांना लंम्पीची लागण झाली असून, जनावरांच्या मृत्यूचे सत्रही सुरू आहे. गत तीन महिन्यांत जिल्ह्यात लम्पी स्किनमुळे तब्बल 306 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

जनावरांचे लसीकरणाचे प्रमाण 100 टक्के - तर या 269 गावातील 3 हजार 809 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्या 3 हजार 809 जनावरे आजारी आहेत. एपी सेंटरमध्ये एकूण 3 लाख 87 हजार 734 जनावरे असून, त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 98 हजार 368 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून याचे प्रमाण शंभर टक्के आहे.

बीड जिल्ह्यात जनावरांना लम्पी रोगाची लागण

लम्पी रूग्णांची स्थिती - बीड जिल्ह्यात लंम्पी रोगाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. 271 गावांमध्ये लंम्पी रोगाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. सध्या लंम्पी रोगाची रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात 3500 आहे. एकूण 8 हजार रुग्ण आढळून आले आहेत. 3500 रूग्ण बरे झालेले आहेत. 4 हजार 500 रुग्ण हे ॲक्टिव्ह आहेत. त्यांना आमचे डॉक्टर रात्रंदिवस उपचार करत असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी सांगितले.

लम्पी रोग - पशुसंवर्धन अधिकारी विजय देशमुख पुढे म्हणाले की, लम्पी हा रोग आहे तो एका विषाणूमुळे होतो, या विषाणूंना वाहून नेण्याचे काम किटक करतात. त्यांच्या चाव्यामुळे हा लंम्पी रोग पसरतो. हा रोग संसर्गजन्य रोग आहे, रोगी जनावरांचे पाणी जर चांगल्या जनावराला दिले तर त्यालाही त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. लंम्पी रोगाचे लक्षणे म्हणजे जनावरांच्या अंगावर फोड येतात, व काही भाग बारीक तर काही भाग मोठा होत चालतो, जनावरांच्या अंगावर सूज येते. त्याच्यासाठी उपाय म्हणून गरम मिठाच्या पाण्याने शेकल्यामुळे हा आजार लवकर कमी होतो, एक लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो मीठ टाकून ते शरीरावर स्पंजीच्या तुकड्याने शेकल्यास दिवसातून तीन-चार वेळेस केल्यास हा आजार लवकर बरा होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.