बीड - यंदा दुष्काळी बीड जिल्ह्यावर वरुण राजाने कृपा केली आहे. मागील आठ दहा वर्षाच्या पावसाच्या सरासरीनुसार परतीच्या पावसावरच बीड जिल्ह्याची मदार असते. यावर्षी मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 61.89 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम असे एकूण 144 सिंचन प्रकल्पापैकी अर्धे प्रकल्प 50 टक्के भरले आहेत. तर काही प्रकल्पांमध्ये 40 ते 45 टक्के पाणीसाठा झाला आहे.
दिलासादायक..! मागील दहा वर्षात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा - kharip crop in beed
लघु प्रकल्पामध्ये बीड जिल्ह्यातील महासांगवी मध्यम प्रकल्प, लांबडवाडी, इंचरणा, मौज, ईट, दुजगव्हाण, पिंपळवंडी व नारायणगड येथील सिंचन प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. अजून पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहेत. या दरम्यान मोठे पाऊस होत असतात. त्यामुळे यंदा पावसाची चांगली परिस्थिती असल्याने बळीराजा सुखावला आहे.
![दिलासादायक..! मागील दहा वर्षात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा good rainfall in beed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8213566-thumbnail-3x2-a.jpg?imwidth=3840)
बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा
बीड - यंदा दुष्काळी बीड जिल्ह्यावर वरुण राजाने कृपा केली आहे. मागील आठ दहा वर्षाच्या पावसाच्या सरासरीनुसार परतीच्या पावसावरच बीड जिल्ह्याची मदार असते. यावर्षी मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 61.89 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम असे एकूण 144 सिंचन प्रकल्पापैकी अर्धे प्रकल्प 50 टक्के भरले आहेत. तर काही प्रकल्पांमध्ये 40 ते 45 टक्के पाणीसाठा झाला आहे.
बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा
बीड जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पामध्ये 50 टक्के पाणीसाठा
Last Updated : Aug 1, 2020, 2:42 PM IST